सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन राजीनामा दिलेल्या माजी मंत्री प्रतीक पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सुरु आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फोन करुन विचारणा केल्याचे तसेच दिल्लीवरुन काही दूत पाठविल्याचे समजतं.


वास्तविक एबीपी माझाशी बोलत असतानाच प्रतीक पाटील यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याच वेळी राहुल गांधींच्या निकटवर्तीयांकडून प्रतीक पाटील यांच्याशी संपर्क करण्यास सुरुवात झाली होती. "मी आता राजीनामा दिल्याने माझ्या बाजूने विषय कधीच संपला आहे. पक्ष नेतृत्वाकडून संपर्क केला जात आहे. पण त्यांना मी विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यास सांगितले आहे," असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

सध्याच्या काँग्रेस पक्षात सोनिया गांधी, वसंतदादांचा विचार राहिलेला नाही, प्रतीक पाटलांचा राहुल गांधींवर निशाणा

दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून सुटलेला नाही. ही जागा कॉंग्रेसकडेच ठेवण्याची मागणी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. यासाठी काँग्रेस नगरसेवक आज सकाळी 10 वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नांदेडमध्ये भेट घेणार आहेत. यासाठी रात्रीच 21 नगरसेवक नांदेडला रवाना झाले आहेत.

VIDEO | अनेकवेळा संपर्क साधूनही राहुल गांधींनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही : प्रतीक पाटील