मुंबई: सचिन वाझे यांच्याकडे सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या. त्यांच्याकडे भरपूर मटेरियल होते. पण सचिन वाझे यांनी कधीही त्याचे पुरावे दिले नाहीत. सचिन वाझे (Sachin Waze) अत्यंत हुशार माणूस होता. ते कधीकधी त्याच्या वकिलांनाही जुमानत नसायचा, असे वक्तव्य चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल (Justice Chandiwal) यांनी केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनेक बाबी उघड केल्या.


सचिन वाझे यांनी त्यांची चौकशी असताना मविआ सरकारच्या काळात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करताना आर्थिक व्यवहार झाल्याचा उल्लेख केला होता. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद केली नव्हती. तर चौकशी सुरु असताना त्यांनी हा विषय पुढे आणायचा प्रयत्न केला. त्यांनी विथ रेकॉर्ड हे सगले समोर आणले होते. पण मी त्याला फार महत्त्व दिले नाही. ही चौकशी सुरु असताना ठाण्याचे एक डीसीपी आणि एक अॅडव्होकेट सतत हस्तक्षेप करत होते. ठाण्याचे डीसीपी त्यांचे ऑफिस सोडून मुंबईत येऊन कसे बसू शकतात? ते नेहमी यायचे, असे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सांगितले.


सचिन वाझे यांनी चौकशीवेळी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा एक व्हॉटसअॅप मेसेज दाखवला होता. त्यामध्ये 40 लाख रुपयांचा उल्लेख होता. तसं बघायला गेलं तर सचिन वाझे यांच्याकडे भरपूर मटेरियल होते. पण ते ज्या पद्धतीने वागायचे, ते कधीकधी त्यांच्या वकिलांनाही जुमानत नव्हते. सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस होता, असे जस्टिस चांदीवाल यांनी म्हटले.


अनिल देशमुख यांच्याकडून फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न: न्यायमूर्ती चांदिवाल


सचिन वाझेने दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती, अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली. मात्र ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलं. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते. मात्र ते मला होऊ द्यायचं नव्हतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिलं नाही, असे न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सांगितले.



आणखी वाचा


अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा