सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेतील पराभवाबद्दल आमदार रोहित पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तासगाव शहरातील नागरिकांनी दिलेला कौल मान्य असल्याचं ते म्हणाले. सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण काही मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याचं रोहित पाटील म्हणाले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ताकदीनं काम करुन विजय मिळवू, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

Rohit Patil : तासगावातील पराभवावर रोहित पाटील काय म्हणाले?

आज झालेल्या तासगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये तासगाव शहरातील नागरिकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. सर्व सामान्य घरातील कार्यकर्त्यांना आणि पक्षाचे काम ग्राऊंडवर करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही निवडणूक लढवताना पक्षाची होती. सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण अवघ्या काही मतांमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. येत्या निवडणुकांमध्ये ताकदीने काम करू आणि विजय मिळवू...!, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

रोहित पाटील यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांचे मनापासून अभिनंदन केलं. तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूजाभाव न करता आपल्या सर्वांना एकत्र घेत लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणाने काम करेन, असा शब्द त्यांनी दिला तासगाव शहरातील नागरिकांना दिला आहे. 

Continues below advertisement

तासगाव नगरपरिषद निकाल

सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

तासगाव नगरपालिकेमध्ये एकूण 24 जागांसाठी आज मतमोजणी झाली यामध्ये माझी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे 13 तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत. 

दरम्यान, संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपरिषदेच्या विजयाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजयकाका पाटील बाजूला पडले होते. तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाद्वारे त्यांनी पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे.