Pandharpur Nagarparishad Election Result : राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले आहेत. बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, पंढरपूर नगर परिषदेत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या (Pandharpur Nagarparishad) तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर त्यांचे आठ वर्षाचे चिरंजीव शौर्य भगीरथ भालके यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विजयी रॅलीत शौर्य भालके याने दंड थोपटत भाजप नेते प्रशांत परिचारक यांना इशारा दिला आहे.
पंढरपूर नगर परिषदेचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके या विजयी झाल्या आहेत. जवळपास 11 हजार 500 मतांनी प्रणिता भालके विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शामला शिरसाट यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर प्रणिता भालके यांचे चिरंजीव शौर्य भगीरथ भालके यांनी दंड थोपटले आहेत.
भगीरथ भालके यांनी तब्बल 14 वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना धक्का देत भगीरथ भालके यांनी तब्बल 14 वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले आहे. आमदार (स्व.) भारत भालके यांच्या सूनबाई प्रणिता भालके ह्या तब्बल 11 हजार 138 इतक्या मोठ्या मताधिक्यांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवित भगीरथ भालकेंनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे. पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके, तर भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारात दोन्ही बाजूंकडून अटीतटीचा प्रचार झाला होता. दोन्ही पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली होती, त्यामुळे पंढरपूरच्या निकालाबाबत उत्सुकता होती. यापूर्वी (स्व.) आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सत्ता मिळवली होती. त्यानंतर भारत भालके यांच्या सूनबाई प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांचा अवघ्या 8,430 मतांनी पराभव झाला होता. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत परिचारकांच्या सत्तेला सुरुंग लावत भगीरथ भालके यांनी त्या पराभवाचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?