नांदेड : सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका, उमेदवारी, अशा गोष्टींना उधाण आले आहे. अशातच आज देगदूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एक जाहीर सभा घेतली. त्या जाहीर सभेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत खोपा, भाजप नेते आशिष शेलार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. 


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीवर टीका केली. "महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज आणि दगाबाज आहेत. सरकारमधील प्रत्येक विभाग मंत्री चालवत नसून दलाल चालवीत आहेत अशी घणाघाती टीका करत सरकार शेतकरी, मजूर, बाराबलुतेदार व सर्वसामान्यांचे नसून सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे". 


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, "अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं आणि शेतकऱ्यांचं काय भलं केलं ते सांगावं" असा सरळ प्रश्न विचारुन तीन वेळा अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. असा खडा सवाल केला. मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा भुईला येतात आणि कणसे कुठे येतात हे माहीत नाही तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजतील. महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढे नुकसान केले आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी साधी पाहणी केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान कसे कळेल, असा प्रश्न रावसाहेबांनी उपस्थित केला. 


ईडीच्या धाडीबद्दल बोलताना रावसाहेब म्हणाले, तुम्ही चोऱ्या केल्या म्हणून धाडी पडत आहेत. तुमचे पाप केंद्राच्या माथी मारू नका. जनता सगळं पाहत आहे, त्यामुळे पंढरपूरनंतर आता देगलूरची चर्चा होईल. काहीही झाले की आपण काही काही करायचे नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचे हे आता बंद करा. 


मोदी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करते. कित्येक योजना मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे मध्ये कोणीही येत नाही. मोदी सरकारला शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी बांधीलकी आहे. त्यांच्यासाठी ते कटिबद्ध आहेत. निवडणुकीत भाजपचेच सराकर जिंकणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल. असे मत रावसाहेबांनी व्यक्त  केले. सुभाष साबणेंवर रावसाहेब म्हणाले, सुभाष दावणे हे सर्व सामान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा विजय मोठाच असेल असा विश्वास रावसाहेबांनी व्यक्त केला. 


रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांबाबत सडेतोड भाष्य केले, मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात का झाडाला लागतात हे माहीत आहे का? महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री घराबाहेर का निघत नाहीत.