Raver Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी हॅट्रिक करत विजय प्राप्त केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला. रक्षा खडसेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे.

रावेर लोकसभा निवडणूक विजयी उमेदवार

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
श्रीराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार  
रक्षा खडसे भाजप रक्षा खडसे

राज्यातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या रावेर मतदारसंघातील बदललेल्या राजकीय गणितांमुळे यंदाची निवडणूक चुरशीने पार पडली. रावेरमध्ये रक्षा खडसेंना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर दुसरीकडे शरद पवारांनी राजकारणात नवखे असलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच चकीत केलं.

एकनाथ खडसे हे रक्षा खडसेंच्या पाठीमागे तर त्यांच्या कन्या या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचारात असं काहीसं चित्र यंदा रावेरमध्ये दिसलं. तर दुसरीककडे  केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी  गिरीश महाजन यांच्यावर रक्षा खडसेंच्या विजयाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे 13 मे रोजी चुरशीने मतदान झालेल्या रावेरमध्ये रक्षा खडसेंनी हॅट्रिक केली.

एकनाथ खडसेंच्या भूमिकेमुळे यंदा रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांनाच तिसऱ्यांदा संधी दिली. रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर सुरुवातीला दिसून आला. तर गेल्यावेळी काँग्रेसकडे असलेली ही जागा यावेळी शरद पवारांनी स्वतःकडे घेत नवखा उमेदवार दिला. 

रावेरमध्ये यंदा 63 टक्के मतदान (Raver Lok Sabha Percentage 2024) 

रावेरमध्ये विधानसभा निहाय मतदान

  • चोपडा- 61.52 टक्के
  • रावेर - 67.77 टक्के
  • भुसावळ - 57.33 टक्के
  • जामनेर - 60.18 टक्के
  • मुक्ताईनगर - 64.56 टक्के
  • मलकापूर - 67.36 टक्के

एकूण - 63.01 टक्के 

2019 च्या निवडणुकीचा निकाल (Raver Lok Sabha Election Result 2024) 

रक्षा निखिल खडसे, भाजप :  6,52,212 मतं 

डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस : 3,18,740 मतं 

नितीन प्रल्हाद कांडेलकर, वंचित बहुजन आघाडी : 88,108 

विजयी उमेदवार 2019 - रक्षा खडसे, भाजप

लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ

  • जामनेर : गिरीश महाजन (भाजप)
  • भुसावळ : संजय सावकारे (भाजप)
  • चोपडा : लता सोनवणे (शिवसेना शिंदे गट)
  • मुक्ताईनगर : चंद्रकांत पाटील (शिवसेना शिंदे गट)
  • रावेर : शिरीष चौधरी (काँग्रेस)
  • मलकापूर : राजेश एकाडे (काँग्रेस)

रावेर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला

गेल्या अनेक वर्षांपासून रावेर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी लेवा पाटील समाजाची मोठी मतं आहेत. एकनाथ खडसे हे लेवा पाटील समाजाचे नेते असून या मतदारसंघात त्यांची घट्ट पकड आहे. त्यामुळे गेल्या दोन टर्मपासून त्यांच्या सून रक्षा खडसे यांचा विजय हा सुकर झालेला आहे. 

एकनाथ खडसेंच्या पाठिंब्यामुळे रक्षा खडसेंची ताकद वाढली

भाजपच्या अंतर्गत राजकारणाला त्रासून एकनाथ खडसे हे मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये गेले होते. शरद पवारांनी त्यांना विधानपरिषदेवर घेऊन आमदार केलं आणि त्यांना बळ दिलं. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी केली होती. तर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधीही दिली. 

त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्याला शह देण्यासाठी भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांनाच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तब्येतीचं कारण सांगून एकनाथ खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. सोबतच त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून पुन्हा घरवापसी करण्याची इच्छा व्यक्त केली. 

लोकसभा निवडणुकीच्या काळात जरी खडसेंचा भाजप प्रवेश झाला नसला तरी त्यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी स्वतः फिल्डिंग लावायला सुरूवात केली. मतदारसंघातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी रक्षा खडसेंना मोठं मताधिक्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले. एकनाथ खडसे स्वतः सक्रिय झाल्यानंतर भाजपची ताकद चांगलीच वाढल्याचं दिसून आलं.

ही बातमी वाचा: