अहमदनगर : जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. राम शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांचा (राधाकृष्ण विखे पाटलांचा) राजीनामा मंजूर झाला आहे. ते कुठं जाणार हे तुम्हाला माहीत आहे. अशोक चव्हाण म्हणत आहेत की, ते विखे पाटलांचं मन वळववण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला विखेंचे पुत्र सुजय विखे म्हणत आहेत की, मी वडिलांना भाजपात आणणार.


शिर्डी लोकसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज श्रीरामपूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले. राम शिंदे म्हणाले की, अशोक चव्हाण विखेंचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर सुजय विखे वडिलांना भाजपात आणणार असल्याचे सांगत आहेत. आता पालकमंत्री म्हणून मी पाहणार आहे की, अशोक चव्हाण आणि सुजय विखेंमध्ये कोण जास्त प्रयत्न करणार.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्वागत ज्या पद्धतीने होत आहे, त्याबद्दल तुमचे आभार, असे स्वागत कुठेही झाले नसेल. विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचे पद सोडले, जिल्हाध्यक्षांनी त्यांचे पद सोडले. यावरुन असं वाटतंय राहुल गांधी आल्यानंतर अहमदनगर काँग्रेस कमिटी बंद. आमची (काँग्रेसची) कुठेही शाखा नाही, आता जिल्ह्यात काँग्रेस नाही. काय जबरदस्त स्वागत केलंय राहुल गांधींचं

VIDEO | राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात येणार : राम शिंदे | शिर्डी | एबीपी माझा