Maharashtra Assembly Election 2024 नागपूर: कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आणि उत्साह काटोल विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार सलील देशमुख यांना भोवला आहे. झालं असं कि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे अवघे दोन मिनिटांचा उशीर झाल्यामुळे सलील देशमुखांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाहीये. त्यामुळे आता ते उद्या मंगळवारला सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मात्र 2019 ची जी काहाणी अनिल देशमुख यांच्या सोबत घडली तीच घटना आज त्यांच्या पुत्राच्या बाबतीत घडल्याने जुनी आठवण नव्याने ताजी झाली आहे.  


पुन्हा तीच 2019 ची कहाणी 


2019 मध्ये अनिल देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाच्या आदल्या दिवशी ( जसं आजचा दिवस आहे) उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन मिनिटांचा उशीर झाला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सलील देशमुख यांच्या संदर्भातही तसेच घडले आहे.


उद्या पुन्हा आई-वडील आणि मित्र पक्षांच्या नेत्यांसह येऊन उमेदवारी अर्ज दाखल करेल. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना एक मिनिटाचा उशीर झाला. बाईकवर येऊन वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र एक मिनिट उशीर झाल्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करू शकलो नाही. आमच्या वकिलांनी सर्व काळजी घेतली आहे. त्यामुळे काटोल मतदारसंघातून तुतारी वाजवणारा माणूस म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार राहील याची खात्री आहे. असा विश्वास  सलील देशमुख  यांनी यावेळी बोलून दाखवला. 


...म्हणून माझ्या एवजी सलील देशमुखांना उमेदवारी


माझ्यावर कसे खोटे आरोप लावून फसवण्यात आले, कसे 14 महिने तुरुंगात ठेवले, या सर्व बाबी संदर्भात सर्व काही लिहिले आहे. दोन तीन दिवसात पुस्तक बाजारात येईल. त्यानंतर गिरीश महाजन विरोधात सीबीआयचा खटला भरला. मी पुन्हा उभा राहिलो असतो तर पुन्हा नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभं न राहता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. सलीलने मला आग्रह करत उभे राहण्यास  म्हंटले, मात्र मी त्याला समजावून सांगितले आणि तो तयार झाला. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार माहाविकास आघाडीचे येणार आहे. त्यानंतर शरद पवार साहेब पहिला विधान परिषदेचा सदस्य आम्हाला बनवतील असा विश्वास आहे. ते मला मंत्रिमंडळातही घेतील असाही विश्वास आहे. मात्र त्यासाठी सलीलला विजयी करावे लागेल. अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.


हे ही वाचा