Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आता राजकारण तापत आहे. गोव्यात यावेळी आम आदमी पक्ष (AAP) जोरदारपणे मैदानात उतरला आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी गोव्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यासाठी आपलं व्हिजन मांडलं. 


आपचं सरकार आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यात आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलणार आहोत. तसेच वीजही मोफत देणार असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, सरकार आल्यास बेरोजगारांना महिना 3 हजार मिळणार. तसेच सरकार झाल्यावर 6 महिन्यात मायनिंग सुरु केली जाईल.  सहा महिन्याच्या आत जमीन हक्क मिळतील. तसेच  दिल्लीप्रमाणे गोव्यामध्ये शाळा, शिक्षण व्यवस्था बदलणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.  दिल्लीप्रमाणे गोव्याची आरोग्य व्यवस्था बदलणार असल्याचंही ते म्हणाले. 18 वर्षांवरील महिलांना 7 हजार देणार असल्याचं आश्वासनं देखील त्यांनी दिलं.  


केजरीवाल म्हणाले की, आम्ही गोव्यात वीज मोफत देऊ. तसेच इथलं पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवू. आपचं सरकार आल्यास 5 वर्षात एका कुटुंबला 10 लाखांचा फायदा होईल. त्यामुळं आपला फायदा 2 हजार घेऊन का 10 लाखानं होणार हे ठरवा, असं केजरीवाल म्हणाले. 


अरविंद केजरीवाल म्हणाले की,  यावेळी बदल होईल असा गोवेकरांना विश्वास आहे.  गोवाच्या आजच्या स्थितीला सर्व पक्ष जबाबदार आहेत. आपल्यावर अन्याय होतोय याचा तरुणांना राग आहे, भ्रष्टाचार केवळ आमची संपवू शकतो, बाकी कुणी नाही, असं केजरीवाल म्हणाले. 


केजरीवाल म्हणाले की, दिल्लीला आम्ही काम केले आहे. आमचा DNA दिल्लीतील काम बघितल्यावर कळतो.  स्वतंत्र मिळाल्यानंतर आमचा पक्ष केवळ एकमेव प्रामाणिक पक्ष आहे. 


केजरीवाल म्हणाले की, तोडफोडीचे राजकारण आम्हाला काळत नाही. आम्ही टीएमसीसोबत जाणार नाही.  उत्पल पर्रीकर आपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत आहे. तसेच मनोहर पर्रीकर यांच्याबदल आदर आहे. असंही केजरीवाल म्हणाले.  संजय राऊत यांनी आपले पाहावे, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. 


गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होईल तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 



Goa Election 2022 Date: गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान, 10 मार्चला होणार मतमोजणी