मुंबई :  राज्यसभा निवडणुकमध्ये (Rajya Sabha Election)  शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande)  यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगोविरोधात सुहास कांदे यांनी  हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


केंद्रीय निवडणूक आयोगानं नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केले. त्यानंतर आता  आमदार सुहास कांदे यांनी  हायकोर्टात धाव घेतली आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात  हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नसल्याचा आरोप कांदे यांनी याचिकेत केला आहे. 


केंद्रीय निवडणूक आयोगानं नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द करण्याचे आदेश दिले होते. सुहास कांदे यांनी मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर ती घडी न घालता तशीच ठेवली असल्यानं त्यांचं मत रद्द करण्यात आले होते. मत बाद करण्यावर
सुहास कांदे यांचा  आक्षेप आहे.  चुकीच्या पद्धतीने मत केले बाद निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.  


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय


Dhananjay Mahadik : बाबांना विजयी गुलाल लागताच लेकाचे डोळे पाणावले ! विधानसभेच्या पायऱ्यांवर महाडिक बाप लेकाची गळाभेट


Rajya Sabha Election Highlights : चुरस, आक्षेप, उत्कंठा अन् सेलिब्रेशन... राज्यसभा निवडणुकीचे टॉप 10 हायलाईट्स