मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. कुठल्याही प्रकारची मतं फुटू नये यासाठी प्रत्येक पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहे. त्याचसोबत मतदान करतांना कोणतीही चूक होऊ नये यासाठी आमदारांना ट्रेनिंग दिलं जात आहे. राज्यसभेचं मतदान कसं करावं यासाठी निवडणूक आयोगाने आमदारांना काही निर्देश दिले आहेत. 


राज्यसभा निवडणूक मतदानाची पद्धत कशी असणार,


1. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपणास दिलेल्या पेनाचाच वापर करा. हे पेन आपणास मतपत्रिकेबरोबर देण्यात येईल. कोणतेही इतर पेन, पेन्सिल किंवा बॉल पेन किंवा चिन्हांकन करण्याचे इतर कोणतेही साधन यांचा वापर करु नका. कारण तसे केल्यास आपली मतपत्रिका अवैध ठरेल.


2. आपला प्रथम पसंतीक्रम म्हणून आपण निवड केलेल्या उमेदवाराच्या नावासमोर दर्शविलेल्या "पसंतीक्रम" या स्तंभामध्ये "1" हा अंक लिहून मतदान करावे. "1" असा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहिण्यात यावा.


3. एकापेक्षा अधिक उमेदवार जरी निवडणूक लढवित असले तरी "1" हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर दर्शविण्यात येईल.


4. निवडून येण्याजोग्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त निवडणूक लढविणारे अनेक उमेदवार असल्यास तुम्हाला अधिक पसंतीक्रम असेल. उदा. जर पाच उमेदवार निवडणूक लढवत असतील आणि केवळ दोनच उमेदवारांना निवडून द्यावयाचे असल्यास तुम्ही तुमच्या पसंतीक्रमानुसार एक ते पाच या उमेदवारांच्या नावांपुढे दर्शविलेल्या अंकाकरिता पसंतीनुसार चिन्हांकन करु शकता.


5. तुमच्या पसंतीक्रमानुसार तुमच्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोरील "पसंतीक्रमाचा चिन्हक्रम" या रकाण्यामध्ये "2", "3", "4" इत्यादी असे अंक लिहून तुम्ही उर्वरित उमेदवारांना पसंती क्रमानुसार मत देऊ शकता.


6. तुम्ही कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच अंक दर्शविला आहे. याची खात्री करा आणि एका पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर तोच अंक दर्शविलेला नाही याचीही खात्री करावी.


7. पसंतीक्रम हा केवळ अंकामध्येच म्हणजेच "9", "2", "3" इत्यादी याप्रमाणे दर्शवावा आणि पसंतीक्रम हा शब्दांमध्ये म्हणजेच एक, दोन, तीन इत्यादी याप्रमाणे दर्शवू नये. अंक आणि शब्द अशा एकत्रित स्वरुपात सुध्दा लिहिण्यात येऊ नयेत.


8. पसंतीक्रम हे "9", "2", "3" इत्यादी सारख्या भारतीय संख्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात किंवा I, II, III याप्रमाणे रोमन स्वरुपात किंवा 1,2,3 या देवनागरी स्वरुपात किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचितील मान्यताप्राप्त कोणत्याही भारतीय भाषेत वापरण्यात येणाऱ्या अंकाच्या स्वरुपात दर्शविण्यात यावेत. 


9. मतपत्रिकेवर तुमचे नाव किंवा कोणतेही शब्द लिहू नका आणि तुमची स्वाक्षरी करु नका किंवा आद्याक्षरे लिहू नका. तसेच तुमच्या अंगठ्याचा ठसा उमटवू नका.यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.


10. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी कोणतेही चिन्ह किंवा 'X' यासारखे चिन्ह दर्शविणे योग्य ठरणार नाही. अशी मतपत्रिका बाद ठरविण्यात येईल. तुमचा पसंतीक्रम फक्त 1,2,3  इत्यादी अंकामध्येच दर्शवावा, पसंतीक्रम शब्दात दर्शवू नये.


11. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी, तुम्ही कोणत्याही एका उमेदवारासमोर 1 हा अंक लिहून तुमचा पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम वैकल्पिक आहेत, म्हणजे तुम्ही दुसरा आणि त्यानंतरचा पसंतीक्रम दर्शवू शकत किंवा दर्शविला नाही तरी चालेल.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.