Rajya Sabha Election 2022 Live Update : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार; संजय राऊत यांचा विश्वास
Rajya Sabha Election 2022 Live Update : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. यासाठी लागणारी जुळवाजुळव सुरु आहे. यासंबंधी प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. अपक्षांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते असेही राऊत यांनी म्हटले.
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक होणारच, शिवसेनाही उमेदवार मागे घेणार नाही,सूत्रांची माहिती, घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अपयशी
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेची निवडणूक अटळ; महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सायंकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभेच्या निवडणूकीबाबत काँग्रेस एनसीपी नेत्यांसमवेत चर्चा करणार- सूत्र
राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना 8 ते 10 जून अशी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर राहण्यासाठी येण्याचे शिवसेनेचे आदेश. राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना 8 जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. 8 जून ते 10 जून अशी व्यवस्था करण्यात आलीय. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडा फोडी होऊ शकते त्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच रणनिती आखल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.
महाविकास आघाडीत राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या बदल्यात एक जागा विधान परिषदेची नेमकी कोणाची कमी करायची यावरून मतभेद ?
काँग्रेस आणि एनसीपी प्रत्येकी दोन जागा विधान परिषदेच्या लढवण्यासाठी आग्रही
शिवसेनाला आता दोन जागा राज्यसभा लढवायची असेल तर एक जागा विधान परिषद कमी लढवावी अशी भूमिका काँग्रेस एनसीपी नेत्यांची - सूत्रांची माहिती
राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना विधान परिषदेची एक जागा कमी लढवावी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाचा दबाव ? - सूत्र
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक: फडणवीसांसोबत पडद्याआड काय चर्चा झाली? मविआ नेत्यांनी स्पष्ट सांगितले
https://marathi.abplive.com/news/mumbai/rajya-sabha-election-2022-positive-discussion-on-rajya-sabha-unopposed-election-with-bjp-says-ncp-leader-chhagan-bhujabal-1065803
Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपला दिला.
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Rajya sabha Election : संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटींची होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Chandrakant Patil LIVE : मविआनं आमचा प्रस्ताव मान्य करावा, तिसरा उमेदवार मागे घ्यावा, आम्ही तिसरी जागा लढवणार, त्यांनी उमेदवार मागे नाही घेतला तर निवडणूक होणारच : चंद्रकांत पाटील
पार्श्वभूमी
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय झाले, याची माहिती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिली. महाविकास आघाडीने दिलेल्या ऑफरबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी आग्रही असल्याचीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपला दिला.
भाजपने काय म्हटले?
महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची तुम्ही ही जागा आम्हाला सोडा आम्ही तुम्हाला विधानं परिषदेची एक जास्तीची जागा देऊ असा प्रस्ताव दिला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आमची चर्चा चांगली झाली आहे. फडणवीस यांचे म्हणणे पक्ष श्रेष्ठींना सांगणार असून दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होईल असेही भुजबळ यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांची घटक पक्ष आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर आम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यासाठीं गेलो होतो अशी माहिती शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी दिली.
संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटींची होणार असल्याचे म्हटले जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -