Rajasthan Assembly Election 2023 : आज, 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Election 2023 Today) मतदान पार पडणार आहे. राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांपैकी 199 जागांवर मतदान पार पडणार आहे. मतदान शांततापूर्ण पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राजस्थानच्या VIP जागांवर सर्वांच्या नजरा आहेत. यामध्ये अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि वसुंधरा राजे यांच्यासह


राजस्थानमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान


(VIP Candidates) अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. राज्यसभा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Counting) इतर चार राज्यांच्या मतमोजणीच्या (Rajasthan Assembly Election 2023 Result) दिवशीच होणार आहे. राजस्थानसह मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram) विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2023 Result) निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.


दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा राज्यातील 22 VIP जागांवर आहेत. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. दोन्ही पक्षांनी अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) निवडणूक लढवत आहेत, तर माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) ही निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) ही निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांसह व्हीआयपी जागांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


राजस्थानचे व्हीआयपी उमेदवार


राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी, मंत्री शांती धारिवाल, बीडी कल्ला, भंवर सिंग भाटी, सालेह मोहम्मद, ममता भूपेश, प्रताप सिंग खाचरियावास, राजेंद्र यादव, शकुंतला रावत, उदय लाल अंजना, महेंद्रजीत सिंग मालवीय, अशोक चंदना आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे व्हीआयपी उमेदवार आहेत. तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठौर, विरोधी पक्षनेते सतीश पुनिया, खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड, बाबा बालकनाथ आणि किरोरी लाल मीना हे व्हीआयपी उमेदवार आहेत.


5 वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा कायम राहणार?


1993 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यापासून राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. या जवळपास तीन दशकांत झालेल्या निवडणुकांमध्ये एकदा भाजप आणि एकदा काँग्रेसने सरकार स्थापन केलं आहे. यावेळीच्या विधानसभा निवडणुकीकडे शासन आणि प्रथा बदलण्याची राजकीय लढाई म्हणून पाहिलं जात आहे. यंदाही पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा कायम राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.