Rajasthan : लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पक्षाच्या 8 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारत आदिवासी पार्टीचे प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी 14 जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. 


उत्तर प्रदेशात कोणाला आघाडी? 


उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसतोय. कारण भाजपच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये कमी होताना दिसत आहेत.  भाजपने युपीमध्ये 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने 32 जागांवर मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पक्षानेही 7 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशला मोठा धक्का बसताना दिसतोय. 


भाजपमध्ये जनता दल (संयुक्त) आघाडीवर 


उत्तर प्रदेशनंतर उत्तर भारतातील आणखी महत्वाचे राज्य असणाऱ्या बिहारमध्येही भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत. जनता दिल युनायटेडने 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पक्षाने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवाय लोक जनशक्ती पार्टीचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये काँग्रेस पक्षाची केवळ 1 जागा आघाडीवर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसला प्रतिसाद मिळालेला नाही. 


गुजरातमध्ये भाजपचा डंका 


गुजरातमध्ये यंदाही भाजपचा डंका पाहायला मिळतोय. भाजपने गुजरातमध्ये 23 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. शिवाय अमित शाहांनी गांधीनगरमधून विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे गांधीनगरमधून अमित शाह यांचा विजय निश्चित मानला जातोय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Election Result : महाराष्ट्रातल्या विजयी उमेदवारांची यादी, 48 मतदारसंघात तुमचा खासदार कोण?  थोड्याच वेळात निकाल हाती