पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींचा हा मानसिक पराभव असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली. मोदींमध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिंमत राहीली नसल्याचेही ते म्हणाले. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना एवढं का घाबरतात याचंही उत्तर मोदींनी जनतेला द्यावं, असं आव्हान राज ठाकरेंनी दिल आहे. तसेच ज्या पत्रकार परिषदेत मोदीच बोलले नाहीत त्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बर अस मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच राज ठाकरे यांनी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तसेच अमित शहा यांना आता कळेल दादागिरी काय असते ते असेही राज ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दादागिरी केली त्यांना आता तीच भोगावी लागणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले
VIDEO | पत्रकार परिषद मोदींची, उत्तरं मात्र शाहांची | एबीपी माझा
यापूर्वीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं होतं. तर मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज्यात दहा प्रचार सभा घेतल्या.
दरम्यान पाच वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरं न गेलेल्या पंतप्रधान मोदींनी शक्रवारी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहितीही दिली. मात्र त्यानंतर पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता "अध्यक्षजी जवाब देंगे" असं म्हणत मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं.
संबंधित बातम्या
पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!, राज ठाकरेंची मोदींवर टीका
Narendra Modi Press | "अध्यक्षजी जवाब देंगे" म्हणत मोदींचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार
साध्वी प्रज्ञाला माफ करु शकणार नाही, नरेंद्र मोदींची नाराजी
नोटबंदी करताना मोदींनी पूर्ण कॅबिनेटला कोंडून ठेवले होते : राहुल गांधी
मोदींनी 18 प्रश्नांची टोलवलेली उत्तरं vs राहुल गांधींची सर्व 15 प्रश्नांना उत्तरं