स्मार्ट बुलेटिन | 18 मे 2019 | शनिवार | एबीपी माझा

  1. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मनापासून माफ करु शकणार नाही, नथुराम गोडसेवरच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाराजी, अमित शहांकडून वाचाळवीरांना नोटीस


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथमध्ये तर उद्या बद्रीनाथला, अखेरचा टप्प्यातल्या मतदानापूर्वी टेम्पल रन, वाराणसी आणि पश्चिम बंगालमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


 

  1. पाच वर्षात पंतप्रधान मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, पण प्रश्नांना बगल राहुल गांधींकडून मोदींच्या पत्रकार परिषदेची खिल्ली


 

  1. वंचित बहुजन आघाडीत फूट, भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांचा राजीनामा


 

  1. मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासाठी सरकारचा अध्यादेश, मात्र खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी नाराज, सुप्रीम कोर्टात दाद मागणार


 

  1. पाणी वाया घालवल्यास नाशिककरांवर दंडात्मक कारवाई, माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, सिडकोमध्ये जनजागृती मोहीम


 

  1. सरकणारा गेट अंगावर पडल्यानं दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नागपूरच्या चक्रपाणी नगरमधील घटना, लेकीच्या जाण्यानं कुटुंबावर शोककळा


 

  1. मुलुंडमध्ये विजय स्टोअर्स नावाच्या कारखान्यावर धाड, आंब्याच्या रसात मिसळवले जाणारे केमिकल पदार्थ जप्त, एफडीएची कारवाई


 

  1. डोंबिवलीत सात मजली अनधिकृत इमारतीवर हातोडा, केडीएमसीची पुन्हा कारवाई, नांदिवली भागात अनधिकृत बांधकामांचं मोठं पेव


 

  1. बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं आज देशभरात कार्यक्रम, पुण्यात धम्म पहाट सोहळ्यात रोणु मुजुमदार, राहुल देशपांडेच्या गाण्याची मैफल