मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात लेकासाठी म्हणजेच अमित ठाकरेंसाठी जाहीर सभा घेतली. साहजिकच येथील सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतील याची उत्सुकता मुंबईसह राज्यातील जनतेला लागून होती. कारण, माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडूनही उमेदवार देण्यात आला आहे. भाजपने महायुतीमधून अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासंदर्भात भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदा सरवणकर आणि महायुतीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने येथे अमित ठाकरे (Amit Thackeray) विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत आहेत. त्यावरुन, राज ठाकरेंनी आज माहीम मतदारसंघात लेकासाठी बॅटींग करताना महायुती व उद्धव ठाकरे या दोघांनाही लक्ष्य केलं. 


राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातील आपल्या भाषणातून ठाकरे कुटुंबीय आणि दादर, माहीम परिसराचं भावनिक नातं सांगितलं. गेल्या तीन पिढ्यांपासून येथील जनतेशी, येथील परिसराशी आपली भावनिक नाळ जुळली असल्याचे सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेचा जन्म देखील याच मतदारसंघातून झाल्याची आठवण सांगितली. यावेळी, सदा सरवणकर यांचं नाव घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी या मतदारसंघात मी समोरच्या उमेदवारासाठी देखील शिवसेनेत असताना सभा घेतल्याचं राज यांनी म्हटलं. तसेच, अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी माघारी घेण्यावरुन रंगलेल्या नाट्यावरही त्यांनी परखडपणे भाष्य करत दोघांनाही झोडल्याचं पाहायला मिळालं. माहीम मतदारसंघात पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. यापूर्वी वरळी मतदारसंघात ठाकरेंनी निवडणूक लढवली, तेव्हा मी तिथं उमेदवारी दिली नाही. ती माझ्या मनातून आलेली भावना होती. 


महायुतीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका


मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही, कोणाला फोन देखील केला नाही. मे काही कोणाला फोन केला नव्हता मी दिला नाही उमेदवार तुम्ही देऊ नका, आज देखील अमित उभा आहे, पण मी भीक मागणार नाही. आमच्या दोघांच्या मनात नव्हतं, त्यामुळे कोणताही विषय नव्हता. मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उमेदवार द्या नाही तर नका देऊ, मी माझा उमेदवार निवडून नक्की आणणार, असे म्हणत अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास राज यांनी व्यक्त केला. 


उद्धव ठाकरेंवर निशाणा


जेव्हा उद्धव आजारी पडलो तेव्हा गाडी घेवुन मी आधी होतो. गेल्या वेळेला जेव्हा आदित्य उभा होता तेव्हा मी म्हटलं की आमच्या कुटुंबातील पहिला माणूस उभा राहत आहे मी तिथे उमेदवार टाकणार नाही, मी माझ्या मनापासुन केलं आहे, असे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. जसा अमित माझ्या पक्षा साठी उभा आहे तसा संदीप पण उभा आहे, मला त्या घाणीत हात घालायचा नाही. तुमच्या हाकेला ओ देणारी माणसं आहेत. त्याचं जरी नाव अमित राज ठाकरे असलं तरी त्याला भेटायला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही, असेही राज ठाकरेंनी म्हटलं. 


सदा सरवणकरांवर टीका


तुम्हाला अपेक्षा असेल की मी आज प्रभादेवीमध्ये आलोय आणि अमित समोरच्या उमेदवाराबद्दल बोलेल पण नाही बोलायचं. पण, जो कोणाचाच नाही त्याबद्दल काय बोलायचं, असे म्हणत सदा सरवणकर यांच्यावर टीका केली. तसेच, सदा सरवणकर हे शिवेसनेतून काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत आल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच, ठाकरेंचे उमेदवार असलेले महेश सावंत हेही काँग्रेसकडून नगरसेवक होते, असे म्हणत राज ठाकरेंनी दोन्ही उमेदवारांना लक्ष्य केलं. 


हेही वाचा


राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज