NFR Recruitment 2024: ईशान्य फ्रंटियर रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरु झाली आहे. एकूण 5647 शिकाऊ पदांसाठी भरती प्रकिया सुरु झाली आहे. या पदांसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट nfr.railways.gov.in वर जाऊन अर्ज करता येतील. या पदांसाठी 4 नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी 3 डिसेंबरपूर्वी अर्ज करता येणार आहे. 


आठ वेगवेगळ्या ठिकाणी विविध पदे भरण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये कटिहार आणि तिंधारिया वर्कशॉपमध्ये 812, अलीपुरदारमध्ये 413, रंगियामध्ये 435, लुमडिंगमध्ये 950, तिनसुकियामध्ये 580, न्यू बोंगाईगाव वर्कशॉप आणि इंजिनीअरिंग वर्कशॉपमध्ये 982 पदे, दिब्रुगड वर्कशॉपमध्ये 814 आणि माळगावमध्ये एनएफआरएडक्वार्टर्समध्ये 661 पदांचा समावेश आहे. भरती सूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 24 वर्षे ठेवण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांमधून युनिटनिहाय, व्यापारनिहाय आणि समुदायनिहाय गुणवत्ता तयार केली जाईल. ही गुणवत्ता ITI गुणांसह किमान 50 टक्के मॅट्रिक गुण एकत्र करून तयार केली जाईल.


अर्ज करण्यासाठी किती फी?


या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रति अर्ज 100 रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग आणि महिला उमेदवार अर्जदारांना शुल्कातून सूट आहे. एकदा तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 50 रुपये अतिरिक्त शुल्क भरून अर्जात कोणतेही बदल किंवा दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात.


दरम्यान, ज्या युवकांना रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा आहे, त्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुकांनी त्वरीत अर्ज करावेत. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट nfr.railways.gov.in वर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 4 नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 डिसेंबर आहे. त्यापूर्वी तरुणांना या जांगासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे युवकांना सरकारी नोकरीची संधी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.