"खडकवासला भागातून जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी तुमच्या टाळ्यांसाठी कधीच बोललो नाही. दरवेळेला आम्ही इथून जातो येतो तेव्हा गाडीमध्ये आमची नेहमीच चर्चा होते, की माझा वाघ गेला. आज खरंतर ते असायला हवे होते," असं राज ठाकरे म्हणाले.
कोण आहेत रमेश वांजळे?
- रमेश वांजळे हे खडकवासल्यातील मनसेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते.
- सोन्याचे दागिने घालत असल्याने रमेश वांजळे यांची गोल्डमॅ म्हणूनही ओळख होती.
- अबू आझमी यांचा विधानसभेत माईक खेचल्यानंतर ते महाराष्ट्रात अधिक प्रसिद्ध झाले होते.
- रमेश वांजळे यांचा 2011 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
- त्यानंतर वांजळे यांच्या पत्नी हर्षदा आणि मुलगी सायली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या.
राज ठाकरे यांनी त्यावेळी राष्ट्रवादीच्या राजकारणावर टीका केली होती. "ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश वांजळे यांना उमेदवारी नाकारली होती त्याच पक्षाकडून हर्षदा वांजळे निवडणूक लढवणार आहेत. याचं आपल्याला वाईट वाटत आहे," अशा शब्दात राज ठाकरे खंत व्यक्त केली होती. शिवाय वांजळे यांना श्रद्धांजली खडकवासला विधानसभेचा पोटनिवडणूक लढवली नव्हती.