Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचाही (BMC Election 2026) समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या सगळ्याला आता अवघा एक महिना शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्ष आजपासून जोमाने मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे दोघे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्या मनोमीलन होऊन दोघेही नित्यनियमाने भेटीगाठी घेत असले तरी मनसे (MNS) आणि ठाकरे गटाच्या अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही. आता महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये ठाकरे बंधू मनसे-ठाकरे गटाच्या (Shivsena) युतीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. (Mumbai news)

Continues below advertisement

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार, असा प्रश्न शिवसैनिक आणि मनसैनिकांना यांना पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच याच येत्या दोन ते तीन दिवसात ठाकरे बंधू आपली अधिकृत युती जाहीर करणार असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी करत उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यातील महापालिका निवडणूक लढवेल, असे सांगितले जात आहे. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने ठाकरे बंधू काँग्रेस सोडून युती जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. 

ठाकरे बंधूंच्या युतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष असणार का, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसशिवाय मुंबईसह जिथे जिथे शक्य आहे त्या महापालिकांमध्ये मनसेसोबत ठाकरेंची शिवसेना युती करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवण्यावर सकारात्मक असतील, त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत मनसे एकत्रित पाहायला मिळू शकते. महापालिका निवडणुकांसाठी पुढील आठवड्यात अर्ज भरायला सुरुवात होणार आहे त्यामुळे युती आघाडीचा निर्णय तातडीने घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता कुठलीही वाट न पाहता तातडीने ठाकरे बंधू आपली युती जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Continues below advertisement

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम, मतदान कधी अन् निकाल कधी?

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरअर्जाची छाननी - 31 डिसेंबरउमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारीचिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारीमतदान - 15 जानेवारीनिकाल - 16 जानेवारी

आणखी वाचा

आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक