Abhishek Bachchan Aishwarya Rai: अभिषेक बच्चननं (Abhishek Bachchan) अलिकडेच त्याच्या आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या (Abhishek Aishwarya Divorce) सततच्या अफवांवर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, जेव्हा एखादी व्यक्ती पब्लिक फिगर असते, तेव्हा तर्क-वितर्क लावणं, अंदाज बांधणं, चर्चा होणं ठरलेलंच असतं.

Continues below advertisement

पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला की, "जर तुम्ही पब्लिक फिगर असाल तर लोक प्रत्येक छोट्या गोष्टीवर अंदाज लावतील. ज्या काही अफवा, चर्चा सुरू आहेत, तो सर्व मूर्खपणा आणि पूर्णपणे खोटं आहे. त्यापैकी काहीही तथ्यावर आधारित नाही. ते फक्त खोटं आणि जाणूनबुजून दुखावणाऱ्या गोष्टी आहेत..."

तिला माझं सत्य माहीतीय अन् मला तिचं : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan On Aishwarya Rai)

अभिषेक बच्चन पुढे बोलताना म्हणाला की, "आमचं लग्न होण्यापूर्वी ते आमच्या लग्नाच्या तारखांबद्दल अंदाज लावत होते. आम्ही लग्न केल्यानंतर, आम्ही कधी वेगळे होणार? हे त्यांनी ठरवायला सुरुवात केली. हा सर्व मूर्खपणा आहे. तिला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं सत्य माहीत आहे... आम्ही एक प्रेमळ, साधं कुटुंब आहोत आणि हेच खरोखर महत्त्वाचं आहे..."

Continues below advertisement

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे त्रास झाला का? यावर बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, "नाही... जर जे बोललं जातंय त्यातलं थोडंही खरं असतं, तर कदाचित आम्हाला दोघांनाही त्रास झाला असता, पण असं काहीच नव्हतं... मी माझ्या कुटुंबाबाबत खोटं सहनच करू शकत नाही..." 

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या संसारात मिठाचा खडा पडलाय? (Aishwarya And Abhishek Divorce Rumors)

गेल्या वर्षी जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या संसारात मिठाचा खडा पडलाय आणि त्यांच्यात आता तिसरी व्यक्ती आल्यामुळे घटस्फोटापर्यंत प्रकरण पोहोचलंय, अशा चर्चांना उधाण आलंय. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत काही ठिकाणी एकत्र दिसल्यानंतर, असं दिसून आलं की, त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, ऐश्वर्या, अभिषेक आणि मुलगी आराध्यासह पुण्यात तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापूर्वी, हे जोडपं आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. डिसेंबरमध्ये, ते एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले होते. त्यांनी आराध्याचा वाढदिवस देखील एकत्र साजरा केलेला.

घटस्फोटाच्या चर्चा का आणि केव्हा सुरू झाल्या? (Why And When Did Rumors About Divorce Begin?)

जेव्हा अभिषेक, ऐश्वर्यानं एका हाय-प्रोफाइल कार्यक्रमात वेगवेगळी एन्ट्री घेतली, तेव्हा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. अभिषेक बच्चनने 'ग्रे घटस्फोट'बद्दल सोशल मीडिया पोस्ट लाईक केली, तेव्हा चर्चा अधिकच वाढली. हा शब्द 50 वर्ष आणि त्याहून अधिक वयाची जोडपी ज्यावेळी लग्न संपवण्याच्या ट्रेंडसाठी वापरतात.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: 53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप