Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप-मनसे (BJP-MNS) युतीच्या हालचालींना वेग आला आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन मुंबईत परतले आहेत. या भेटीनंतर मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असं सांगितलं जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray Delhi Visit) आणि अमित शाहांमध्ये (Raj Thackeray Amit Shah Meet) लोकसभेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.


बाळा नांदगावकर काय म्हणाले?


मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितलं की, 'राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे काल दोघे दिल्लीला गेले होते. त्यांची अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक झाली. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. एक दोन दिवसात माहिती समोर येईल. लोकसभा निवडणूक सध्या चालू आहे, त्यामुळे त्याबाबतचीच सकारात्मक चर्चा झाली. लोकसभेच्या किती सीट मिळाव्या याबाबत राज ठाकरेंनी अमित शाहांना माहिती दिली. '


पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम


बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, 'मला उमेदवारी देणार की नाही, याबाबत सर्व पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. मी दोनवेळा लोकसभा लढवलेली होती, दक्षिण मुंबईतूनच लढवलेली, आता जर राज ठाकरे म्हणाले, तुला गडचिरोलीला जाऊन लढायचं आहे तर, मी तिकडे जाऊन लढेन, दोन जागा वगैरे जे काही असेल त्याबाबत चर्चा होईल.'






राज ठाकरे यांनी घेतली अमित शाहांची भेट


मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले,  त्यानंतर मंगळवारी त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. अमित शाहांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईत परतले आहेत. मात्र, भाजप-मनसे युतीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


पाहा व्हिडीओ : मनसेने भाजपला कोणता प्रस्ताव दिला?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : राज ठाकरे मुंबईत परतल्यावर फडणवीसांची दिल्लीवारी? मनसे-भाजप युतीवर निर्णय होणार?