Rahul Narvekar मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अॅड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहे. 

यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 1962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. तसेच सयाजी सिलम हेही दोनवेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे 11 वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल. आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 

संयुक्त महाराष्ट्रात आजवर कुणाकुणाला मिळाले पद?

अध्यक्षांचे नाव  कार्यकाळ  राजकीय पक्ष
सयाजी सिलम १ मे १९६० ते १२ मार्च १९६२ काँग्रेस
बाळासाहेब भारदे १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७ काँग्रेस
बाळासाहेब भारदे १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२ काँग्रेस
बॅ. शेषराव वानखेडे २२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७ काँग्रेस
बाळासाहेब देसाई ४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८ काँग्रेस
शिवराज पाटील १७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९ काँग्रेस
प्राणलाल व्होरा १ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८० काँग्रेस
शरद शंकर दिघे २ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५ काँग्रेस
शंकरराव जगताप २० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९० काँग्रेस
मधुकरराव चौधरी २१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५ काँग्रेस
दत्ताजी नलावडे २४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९ शिवसेना
अरुण गुजराथी २२ ऑक्टो. १९९९ ते १७ ऑक्टो. २००४ राष्ट्रवादी
बाबासाहेब कुपेकर ६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९ राष्ट्रवादी
दिलीप वळसे पाटील ११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४ राष्ट्रवादी
हरीभाऊ बागडे १२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९ भाजप
नाना पटोले १ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१ काँग्रेस
राहुल नार्वेकर ३ जुलै २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२ भाजप

हे ही वाचा