Relationship: प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं.. जिथे प्रेम असेल तिथे जोडीदारांमध्ये छोटे-मोठ वाद, भांडणं आलीच, पण हे वाद जेव्हा विकोपाला जातात किंवा प्रेमात धोका मिळतो, एकमेकांचा विश्वास राहत नाही तेव्हा हे नातं तुटतं. पण याचा प्रचंड त्रास काही लोकांना होतो. नातं पुन्हा जोडू शकत नाही हे समजल्यावर अनेकदा काही लोकांना आपल्या पूर्वीच्या जोडीदाराला विसरणे अशक्य होते. तसेच भविष्यात मूव्ह ऑन करायला प्रचंड अडचणी येतात. शारिरीक तसेच मानसिक स्थितीवर परिणाम होतो. अशा प्रकारचा त्रास तुम्हालाही होत असेल तर रिलेशनशिप तज्ज्ञांकडून काही खास टिप्स जाणून घ्या.. 


ब्रेकअप होऊनही जोडीदाराला विसरणे कठीण?


प्रेम ही एक तीव्र भावना आहे, जी सहजासहजी नष्ट होऊ शकत नाही. प्रेमात पडलेला माणूस इतका असहाय्य होतो की जोडीदाराशी ब्रेकअप होऊनही त्याला विसरणे कठीण होऊन बसते. प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात खोल आणि गुंतागुंतीची भावना आहे. जेव्हा दोन व्यक्ती नात्यात येतात, तेव्हा त्यांच्यात अनेक आठवणी, भावना आणि स्वप्ने जोडली जातात, पण जेव्हा हे नाते तुटते तेव्हा ती व्यक्ती शून्यतेच्या आणि वेदनांच्या दलदलीत अडकलेली दिसते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की पूर्वीच्या जोडीदाराला विसरणे शक्य आहे का?


 मूव्ह ऑन होण्यासाठी काय अडचणी येतात?


रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, प्रेमात पडलेल्या व्यक्तीला पुढे जाणे कठीण होते, कारण त्याचे हृदय आणि मन दोन्ही त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये गुंतलेले असतात. त्यांची आवडती ठिकाणे, गाणी किंवा भेटवस्तू यासारखी प्रत्येक छोटी गोष्ट जुन्या आठवणी परत आणते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, हे सवयी आणि आसक्तीचे परिणाम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत क्वालिटी टाईम घालवता, तेव्हा तुमचे मन एका सेट पॅटर्नमध्ये येते. नातेसंबंध संपल्यानंतरही मेंदूला ते बंध तोडायला वेळ लागतो. मूव्ह ऑन होण्यासाठी अडचण येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपण अनेकदा आपल्या एक्स जोडीदाराला 'आदर्श' मानत असतो. आपण त्यांच्या सकारात्मक बाबी अधिक लक्षात ठेवतो आणि नकारात्मक गोष्टी विसरतो. याला 'रोझी रेट्रोस्पेक्शन' म्हणतात. हे आपल्याला त्या व्यक्तीची आणखी आठवण करून देते आणि आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही.


X जोडीदाराला विसरणे शक्य आहे?


रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की X जोडीदाराला विसरणे अशक्य नाही. यासाठी सर्वात आधी स्वत:ला वेळ देणे आणि स्वत:ला स्वीकारणे महत्त्वाचे आहे. स्वतःला नवीन गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा, जसे की एखादा छंद जोपासणे, मित्रांसोबत वेळ घालवणे किंवा नवीन ठिकाणी प्रवास करणे. सोशल मीडियावर तुमच्या X जोडीदाराला फॉलो करणे थांबवा, जेणेकरून त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर येऊ नयेत.


स्वतःला मजबूत करा आणि विश्वास ठेवा


रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, आपल्या मनात हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की  मूव्ह ऑन होणे ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. स्वतःला मजबूत करा आणि विश्वास ठेवा की एक दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून तुमचे हृदय आणि मन मुक्त करू शकाल. प्रेमात हार मानण्याची गरज नाही, कारण प्रत्येक शेवट हे नवीन सुरुवातीचे लक्षण आहे.


हेही वाचा>>>


Relationship: आणखी काय हवं! बायको तुमच्या सर्व गोष्टी मान्य करेल, जया किशोरीच्या 7 टिप्स जाणून घ्या, नातं टिकेल दीर्घकाळ


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )