अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पारंपरिक अशा अमेठी लोकसभेसाठी निवडणूक अर्ज भरणार आहेत. अमेठीमध्ये अर्ज भरण्याआधी राहुल गांधी रोड शो करणार आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. रोड शो सकाळी 10 वाजता मुंशागंजपासून सुरु होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणार आहेत, याआधी 4 एप्रिलला राहुल गांधींनी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला आहे.


VIDEO | राहुल गांधींकडून लोकसभेसाठी वायनाडचीच निवड का? | ग्राऊंड रिपोर्ट | एबीपी माझा



अमेठी आणि वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठीमध्ये त्यांचा सामना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींसोबत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

मोदी, इराणींकडून राहुल गांधींवर टीका
दुसरीकडे वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींनी निशाणा साधला होता. राहुल गांधींना अमेठीमध्ये पराभव दिसत आहे. त्यामुळंच  केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी दक्षिणेत पळ का काढला? असा सवाल मोदी यांनी केला. तर राहुल गांधींनी 15 वर्षांपासून अमेठीतील जनतेच्या मदतीने सत्तेची मजा घेतली आणि आता ते दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हा अमेठीतील जनतेचा अपमान आहे आणि इथले लोक हे सहन करु शकणार नाही," असं स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.

वायनाडमध्ये तुषार वेल्लापल्ली यांच्याशी लढत
वायनाडमध्ये एनडीएचे उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांच्यासोबत राहुल गांधींची मुख्य लढत असेल. तुषार वेल्लापल्ली हे भारत धर्म जन सेनेचे (बीडीजेएस) अध्यक्ष आहेत. केरळमध्ये भाजप आणि बीडीजेएस यांची आघाडी आहे. तुषार वेल्लापल्ली यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. तुषार वेल्लापल्ली यांनी काल वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

राहुल गांधींकडे 15 कोटींची मालमत्ता

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड येथून आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरतांना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांच्या नावे एकूण 15.88 कोटींची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षात राहुल गांधी यांच्या मालमत्तेत एकूण 6.48 कोंटींची वाढ झाली आहे. राहुल गांधी यांच्याकडे 2014 मध्ये एकूण 9.4 कोटींची संपत्ती होती. विशेष म्हणते त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडून 5 लाख रुपयांच कर्ज देखील घेतलं आहे. राहुल गांधी यांच्याकडे 5 कोटी 50 लाख 58 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्तेची किंमत 10 कोटी 8 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशारीतीने त्यांच्याकडे एकूण 15 कोटी 80 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

राहुल गांधी यांच्याकडे फक्त 40 हजार रुपये रोख रक्कम आहे. 17 लाख 93 हजार रुपयांची बँक डिपॉझिट आहे. यंग इंडियनचे एकूण 1900 शेअर्स त्यांच्याकडे आहेत, ज्याची किंमत 19 लाख रुपये आहे. पीपीएफमध्ये 39 लाख 89 हजार रुपये आहेत. याशिवाय 333.30 ग्रॅम सोनं आहे, ज्याची किंमत 2 लाख 91 हजार रुपये आहे. तर म्युचुअल फंडमध्ये एकूण 5 कोटी 19 लाख रुपये आहेत. अशी एकूण 5 कोटी 80 लाखांची जंगम मालमत्ता राहुल गांधीकडे आहे.

महरोलीच्या सुल्तानपूरमध्ये प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या नावे संयुक्तरित्या 1 कोटी 32 लाखांची जमीन आहे. गुरुग्राममध्ये सिग्नेचर टॉवर बीमध्ये व्यावसायिक इमारत आहे, ज्याची किंमत 8 कोटी 75 लाख रुपये आहे. अशी एकूण 10 कोटी 8 लाखांची स्थावर मालमत्ता राहुल गांधींकडे आहे.

राहुल गांधींच्या नावे 72 लाखांचं लोन
राहुल गाधींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या नावे एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे 72 लाख रुपयांचं कर्ज आहे. 5 लाख रुपयांचं लोन त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडूनही घेतलं आहे.

संबंधित बातम्या

वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार दोन 'राहुल गांधी'


भाजपमध्ये ज्येष्ठांचा अवमान, मोदींनी स्वतःचे गुरु लालकृष्ण अडवाणींना डावललं : राहुल गांधी


VIDEO | वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया | एबीपी माझा


राहुल गांधी यांचं वायनाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन 


राहुल गांधी यांचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल