Punjab Election 2022 : सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान होत आहे. तसेच येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज पंजाबच्या दैऱ्यावर आहेत. पंतप्रधान आज पंजाबच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा घेणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukt Kisan Morcha) त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जालंधरमध्ये भव्य रॅली होणार आहे. त्या रॅलीसाठी पंजाब पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, रॅलीमध्ये 25 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, भाजपकडून या मेळाव्याला 40 हजार लोक पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाबचे प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत सुरक्षेच्या मुद्द्यावर पंजाब पोलिसांच्या संपर्कात आहेत. गजेंद्र शेखावत यांच्यासह पोलिसांनीही रॅली मैदानाची पाहणी केली. मोदींच्या सुरक्षेसाठी फुलप्रूफ प्लान तयार करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.


पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी 14 विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नेते पोहोचणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मेळाव्यात 400 बसेस पोहोचणार असल्याचे भाजपने सांगितले आहेत.  दुसरीकडे, युसंयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याला शांततेने विरोध करण्याचा दावा केला आहे. एसकेएमने म्हटले आहे की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते पीएम मोदी ज्या मार्गावर जातील त्यावर काळे झेंडे दाखवतील. केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केल आहे.  गेल्या महिन्यात शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कुचराई झाली होती. पीएम मोदी फिरोजपूरच्या रॅलीत सहभागी न होता दिल्लीला परतले होते. त्यामुळे आजच्या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: