Punjab Assembly Election 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या निमित्ताने जोरदर प्रचाराला सुरूवात देखील केली आहे. दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Chief Minister Charanjit Singh Channi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate) पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचा भाचा भूपेंद्र सिंह हनी (Bhupendra Singh Honey) याला अवैध खाण प्रकरणात अटक केली. याप्रकरणी भूपेंद्र सिंह हनी यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. हमी यांना न्यायालयाने 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या भाच्यालाच अटक झाल्याने विरोधकांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे विधनसभेच्या निवडणुका लागल्या असताना दुसरीकडे अशी अटक होण्यामुळे काँग्रेसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना या मुद्यावरुन काँग्रेसच्या विरोधात बोलण्याची संधीच मिळाली आहे. 
 
 या प्रकरणावर पंजाबचे मुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा म्हणाले की, भूपेंद्र सिंह हनी असे काही करणार हे आम्हाला पहिल्या दिवसापासूनच माहीत होते. निवडणुकीपूर्वी ईडीच्या माध्यमातून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दलित कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम बंगालमध्येही केंद्र सरकारने आपल्या AGC च्या माध्यमातून त्रास दिला होता, पण तेथील जनतेने त्यांचा पराभव केला. पंजाबमध्येही जनता त्यांना हरवून उत्तर देईल असे वक्तव्य यावेळी सुखजिंदर रंधावा यांनी केले. तसेच काँग्रेसचे मंत्री तृप्त राजिंदर बाजवा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला हेच करायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांचा असाच छळ करण्यात आला होता. ईडीने महाराष्ट्रातही छापे टाकले. ईडीच्या या छाप्यांचा सर्वसामान्यांवर काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री चान्नी यांचे पंजाबमध्ये चांगले काम आहे, हे पंजाबमधील लोकांना माहीत असल्याचे बाजवा म्हणाले.


शिरोमणी अकाली दलाचे आमदार बिक्रम मजिठिया यांनी या प्रकरणावरुन चन्नी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चनी मनी हनी अस म्हणत मजिठिया यांनी टीका केली आहे. आधी मनी पकडले, मग हनी पकडले, आता चन्नी यांनाही पकडले जाईल असेही यावेळी मजिठिया म्हणाले. जे पैसे सापडले आहेत ते हनीचे नाही तर ते चन्नी यांचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारवाई करायचीच असेल तर चन्नी यांच्यावर व्हायला हवी असेही ते म्हणाले. याबाबत कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, तुम्ही भाजपवर आरोप का करत आहात. जर त्याने भ्रष्टाचार केला असेल तर, त्याच्यावर कारवाई होईल असे अमरिंदर सिंह म्हणाले. या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स या एजन्सीच्या माध्यमातून हईल असे ते म्हणाले.


दरम्यान, 6 फेब्रुवारीला काँग्रेस पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार आहे. काँग्रसचे खासदार राहुल गांधी मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी दोन नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. एक म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि दुसरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू. मात्र, यापूर्वीचे चन्नी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्य बातम्या: