पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे पहिले कल हाती आले आहेत. पुण्यामध्ये भाजप 32 ठिकाणी आघाडीवर आहे तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून 14 ठिकाणी आघाडीवर आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या तासामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त लढत असून दोन्ही पक्ष समसमान जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय.
पुण्यामध्ये मुख्य लढत ही भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी आहे. पिंपरीतही तशीच लढत आहे. यामध्ये पुण्यात भाजप काहीशी आघाडीवर दिसतेय तर पिंपरीत मात्र जोरदार टशन सुरू असल्याचं दिसतंय.
प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राजेंद्र शिळीमकरस, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे हे विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले हेदेखील विजय झालेले आहेत. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे च्या यांचा पराभव केला आहे.
पुण्यामध्ये गुंड गजा मारणेची पत्नी पिछाडीवर आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम आहे. स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम आहे. त्यामुळे मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 25 मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.
Pune Election Result : पुण्याचा पहिला कल हाती
भाजपा 39शिवसेना उबाठा 0शिवसेना शिंदे 2राष्ट्रवादी-१० शरद पवार-४काँग्रेस 2इतर 0
Pimpri Chinchwad Election Result : पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 15शिवसेना - 02राष्ट्रवादी - 14काँग्रेस - 00शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00राष्ट्रवादी (शरद पवार) - 01महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00