प्रिया दत्त यांनी त्यांच्या शपथपत्रात नमूद केले आहे की, त्यांची वार्षिक कमाई 13.13 कोटी रुपये इतकी आहे. 2014 साली शपथपत्रात त्यांनी त्यांची वार्षिक कमाई 56.86 लाख असल्याचे सांगितले होते. 2014 साली दत्त यांच्याकडे 3.19 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यामध्ये वाढ होऊन आता त्यांच्याकडे 17.84 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर दत्त यांच्याकडे 60.3 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती, ती वाढून आता 69.77 कोटी रुपये झाली आहे. प्रिया दत्त या मुंबईतल्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.
वाचा : पदवीधर पार्थ पवार 41 कोटींचे मालक, तर दहावी नापास श्रीरंग बारणे अब्जाधीश
प्रिया दत्त यांच्या विरोधात मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून भाजपच्या पूनम महाजन या उमेदवार उभ्या आहेत. पूनम महाजन यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 97.96% घट झाली आहे. पूनम महाजन यांच्याकडे 2014 साली 108 कोटी रुपयांची संपत्ती होती. आता त्यांच्याकडे केवळ 2.20 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे शेतजमीन, व्यावसायिक इमारत किंवा घर यापैकी काहीच नाही.