नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करु पाहात आहेत. कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना राफेल विमान खरेदी-अनिल अंबानी, नीरव मोदी आणि अमित शाह-नोटबंदी यापैकी कोणत्याही विषयावर माझ्यासोबत चर्चा करुन दाखवा, असे आव्हान दिले आहे. राहुल गांधी यांनी दिलेले हे आव्हान नरेंद्र मोदी स्वीकारतात का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


राहुल यांनी म्हटले आहे की, प्रिय पंतप्रधान, तुम्ही देशातल्या भ्रष्टाचारावर माझ्यासोबत चर्चा करण्यास घाबरत आहात का? मी तुमच्यासाठी हे काम सोपं करतो. चला, पुस्तक उघडून तुम्ही या विषयांचा अभ्यास करायला सुरुवात करा. पहिला धडा : राफेल+अनिल अंबानी, दुसरा धडा : नीरव मोदी, तिसरा धडा : अमित शाह+नोटबंदी.

राहुल गांधी यांचा दावा आहे की, "राफेल व्यवहारादरम्यान उद्योगपती अनिल अंबानीला फयदा मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार करण्यात आला आहे". तर नीरव मोदी हा भामटा पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळून गेला आहे. तसेच काँग्रेस नोटबंदीलादेखील एक मोठा घोटाळा मानते. त्यामुळेच राहुल यांनr या तीन विषयांवर मोदींना चर्चा करण्याचे आव्हान केले आहे.


याआधीदेखील राहुल यांनी मोदींना चर्चा करण्याचे आव्हान केले आहे. परंतु मोदींनी अथवा कोणत्याही भाजप नेत्याने हे आव्हान कधीही स्वीकारले नाही.