PM Narendra Modi Nomination : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत मतदानाचे (Voting) चार टप्पे पूर्ण झाले आहेत. अद्याप तीन टप्पे बाती आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे  वाराणसी लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत आहेत. यासाठी आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज (Nomination Form) दाखल करण्यापूर्वी पंतप्रधानांनी दशाश्वमेध घाटावर गंगा पूजन केलं. तसेच कालभैरव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.


सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान वाराणसीतून लढवतायेत निवडणूक


पंतप्रदान मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2014 पासून पीएम मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. पीएम मोदींच्या नामांकनावेळी सीएम योगी आदित्यनाथ उपस्थित होते. PM मोदींच्या नामांकनात 12 NDA राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते.पीएम मोदींच्या नामांकनासाठी आलेले आरएलडी प्रमुख जयंत चौधरी म्हणाले, वाराणसीच्या मतदारांसाठी हा खास क्षण आहे. पंतप्रधान मोदींच्या नामांकनात आम्ही सहभागी झालो हा आपल्या सर्वांसाठी खास क्षण आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. लोकांच्या आशीर्वादाने आम्ही लोकसभेच्या 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


वाराणसीत दिग्गज नेत्यांच उपस्थिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवार अर्ज भरण्यासाठी सुरु केलेल्या रॅलीत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्य उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशसह भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री वाराणसीमध्ये एकत्र आले आहेत. पंतप्रधानांच्या नामांकनात केवळ यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश नसून, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.


देशातील मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. अद्याप लोकसभेसाठी मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. पाचवा टप्पा 20 मे रोजी, सहावा टप्पा 25 मे रोजी आणि सातवा आणि शेवटचा टप्पा हा 1 जून रोजी होणार आहे. तर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे.


महत्वाच्या बातम्या:


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे  वाराणसी लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत आहेत. यासाठी आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.