Prakash Mahajan on BJP : 'आम्हाला त्यांनी मतं नाही दिली, मित्र पक्षाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची काय देणार? माझा तर सल्ला आहे, त्यांनी तीन मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्या टाकाव्यात', असं वक्तव्य मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केलं आहे. अमित ठाकरेंसाठी दिलेला शब्द भाजपने (BJP) फिरवला असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. एबीपी माझासोबत त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज्यातील विधानसभाच्या रणधुमाळीतील सुरुवातीचे कौल सध्या समोर येत आहेत. त्यामध्ये अनेक दिग्गज नेते हे सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यातच मुंबईतील प्रतिष्ठेची असलेली माहिम विधानसभा मतदारसंघाची लढत ही महत्त्वाची होती. ठाकरे गटाचे महेश शिंदे, शिंदे गटाकडून सदा सरवणकर, आणि मनसेकडून राजपुत्र अमित ठाकरे हे मैदानात होते. यामध्ये अमित ठाकरे पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
प्रकाश महाजन यांनी काय म्हटलं?
प्रकाश महाजन यांनी म्हटलं की, महायुतीच्या त्सुनामीमध्ये महाविकास आघाडी वाहून गेली. त्यापेक्षा आमचं दु:ख कमी आहे. अमित ठाकरेंसाठीही भाजपने शब्द दिला होता. पण आता भाजप फिरलीये.भाजपचा हा स्वभाव नवीन नाही. नवीन भाजपची नवीन रीत आहे. मी त्या सगळ्या महायुतींचं अभिनंदन करतो. भाजपने मौलाना सय्यद नोमानींना अभिनंदनाचा ठराव पाठवावा. त्यांनी जर का फार भूमिका घेतली नसती तर भाजपला एवढा विजय मिळाला नसता.
तीन मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्या टाकाव्यात - प्रकाश महाजन
आम्ही त्यांना पाठिंबा मागायला गेले नव्हतो.आशिष शेलार यांनी स्वत: देवेंद्र फडणवीसांची वाक्य आहेत. तो त्यांनी फिरवला हा त्यांचा प्रश्न. भाजपने मित्रपक्षासाठी त्याग करावा, असं म्हणतायत. आम्हाला मतं दिली नाही, ते त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देणार काय? मझा तर असा सल्ला आहे, तीन मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्या टाकाव्या. आम्हाला समधान आहे की, बाकीचे वाहून गेले आम्ही निदान पाय टाकून उभे तरी आहोत.
भाजपने शब्द फिरवला नाहीये - केशव उपाध्ये
दरम्यान प्रकाश महाजनांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपच्या प्रकाश महाजनांनी म्हटलं की, भाजपने शब्द फिरवला असं नाहीये, कारण महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र होतो. ती जागा शिवसेनेच्या वाटेची होती. शिवसेनेला आम्ही सगळ्यांनी विनंती केली.आमची ती भूमिका होती.