Maharashtra Assembly Election 2024 : राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकांमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबद्दल जे सांगितले जातंय आणि त्या वक्तव्यावरून जो वाद सुरू आहे, त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष  प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठा दावा केला आहे. या वेळी ते म्हणाले की, राजदीप सरदेसाई सारख्या ज्येष्ठ पत्रकाराने अशा प्रकारचे माहिती पुरवणं आणि लोकसत्त्तेसारख्या वृत्तपत्राने फ्रंट पेजवर अशा प्रकारचे बातम्या लावणं यामध्ये काहीतरी वास येतोय.


या बातमीत कोणतेही तथ्य नसताना अशा बातम्या येणं म्हणजे यामागे कुणाचा तरी हात आहे आणि हा कुणाचा आता हे मला नक्की माहित आहे. याचा खुलासा मी लवकरच करणार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बदनाम करून महायुतीत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न या मार्फत होत असल्याच्या खळबळजनक आरोप प्रफुल्ल पटेल  यांनी केला आहे. ते गोंदिया येथे बोलत होते.


मी सकाळीच त्यांना विचारलं, ते म्हणाले.... 


राजदीप सरदेसाई यांच्या द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ होतोय. त्यात भुजबळांनी ईडीच्या कारवाई पासून वाचण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो असं म्हटल आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की, "अधिकृतपणे सांगू इच्छितो की, राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातल अधिकृत वक्तव्य छगन भुजबळ यांचं नाही. मी सकाळीच त्यांना विचारलं, ते म्हणाले मी अजिबात असं काही बोललो नाही. तर या विषयावर मी कायद्याच्या द्वारे जी कारवाई करता येईल ते करणार असल्याच त्यांनी मला सांगितलं  आहे. असेही ते म्हणाले.


आमच्या पक्षाने महायुतीचा धर्म पाळण्याचा काम केलंय- प्रफुल्ल पटेल


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली आहे. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना विचारले असता, आमच्या पक्षाने महायुतीचे धर्म पाळण्याचा काम केल आहे. भांडण होऊ नये यासाठी झुकत माप घेऊन आम्ही धर्म पाळला. महाराष्ट्रात महायुतीची सरकार यायला पाहिजे, त्या हिशोबाने आमची भूमिका राहिलेली आहे. असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या