अकोला : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यामध्ये विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. अकोला मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे (Anup Dhotre), काँग्रेसचे डॉ. अभय पाटील (Abhay Patil) व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात तिरंगी लढत झाली. तर नुकत्याच पार पडलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा कमळ फुललं आहे. भाजप व काँग्रेस यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी बाजी मारली. तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा 40 हजार 626 मतांनी पराभव केला. वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची तिसऱ्या स्थानावर गेले. अकोला लोकसभेला भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली होती. 

सध्याचे अकोला जिल्ह्यातील आमदार : (Akola MLA List)

  • अकोट विधानसभा - प्रकाश भारसाकळे (भाजप) 
  • बाळापूर विधानसभा - नितीन देशमुख  (शिवसेना - उद्धव ठाकरे)
  • अकोला पश्चिम विधानसभा - गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
  • अकोला पूर्व विधानसभा - रणधीर सावरकर (भाजप)
  • मूर्तिजापूर विधानसभा -  हरीश पिंपळे (भाजप)

अकोला जिल्ह्यातील लढती :

एकूण मतदारसंघ : 05

मतदारसंघांची नावे : अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मुर्तिजापूर (राखीव - अनुसुचित जाती) 

अकोल्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 अकोला पश्चिम  विजय अग्रवाल : भाजप  साजिदखान पठाण : काँग्रेस 

डॉ. अशोक ओळंबे : प्रहार

 हरीश आलिमचंदानी  अपक्ष

राजेश मिश्रा :  अपक्ष

 
2  अकोला पूर्व रणधीर सावरकर : भाजप गोपाल उर्फ आशिष दातकर : शिवसेना ठाकरे गट ज्ञानेश्वर सुलताने : वंचित बहुजन आघाडी  
3 अकोट प्रकाश भारसाकळे  : भाजप महेश गणगणे : काँग्रेस 

दिपक बोडखे : वंचित बहुजन आघाडी

ललित बहाळे  : स्वतंत्र भारत पक्ष - प्रहार आघाडी 

 
4 बाळापूर बळीराम सिरस्कार : शिवसेना शिंदे गट नितीन देशमुख : शिवसेना ठाकरे गट

नातिकोद्दीन खतीब : वंचित बहुजन आघाडी 

कृष्णा अंधारे : अपक्ष

 
5 मुर्तिजापूर हरीश पिंपळे : भाजप सम्राट डोंगरदिवे : राष्ट्रवादी शरद पवार

डॉ. सुगत वाघमारे : वंचित बहुजन आघाडी

रवी राठी : प्रहार

 

आणखी वाचा

Maharashtra All party candidate List : महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघातील लढती