नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना 4 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान वेगवेगळ्या माध्यम संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये (Exit Polls Result) देशात पुन्हा एकदा भाजप सरस ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एक्झिट पोलच्या या पुरक अंदाजानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कामाला लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या 100 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. 


आज बोलावल्या एकूण सात बैठका 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकूण सात बैठका घेणार आहेत. या बैठकांत इशान्य भारतात आलेल्या वादळावर चर्चा होणार आहे. या वादळाच्या अनुषंगाने काय तयारी चालू आहे, काय काम केलं जातंय यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


100 दिवसांच्या मास्टर प्लॅनवर काम


मिळालेल्या माहितीनुसार सरकारमध्ये पुन्हा एकदा आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाच्या कामांबाबत ते एक मास्टर प्लॅन तयार करणार आहेत. त्यासाठी तयारीदेखील चालू झाली आहे. त्याच अनुषंगाने मोदी यांच्या एकूण सात बैठकांना आता महत्त्व आले आहे.     


देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार?


1 जून रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यावेळीही भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला एकूण 353-383  जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) 152 ते 182 जागा मिळू शकात. हा अंदाज खरा ठरल्यास मोदींचा पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा होईल. 


नरेंद्र मोदी यांचे खास ट्वीट


दरम्यान, मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी देशातील मतदारांचे एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीला जनतेने नाकारले आहे, असा दावाही त्यांनी केला. 


एबीपी सी वोटर एक्झिट पोल


महायुती


भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी


ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12 


हेही वाचा : 


'गुलाल आपलाच' म्हणत बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स


Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?


नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांचं मिशन 'हॉटेल बुकिंग', रत्नागिरीत जल्लोषाची आतापासूनच तयारी!