नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एका प्रकरणात निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन संबोधल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमदर्शनी आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे हे प्रकरण निकाली काढत आहोत, असं आयोगाने सांगितलं.

याआधी पंतप्रधान मोदींना सोमवारी (6 मे) आणखी दोन प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली होती. मोदींना आतापर्यंत नऊ प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळाली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "तुमच्या वडिलांचे दरबारी त्यांना मिस्टर क्लीन म्हणायचे, पण त्यांचं आयुष्य भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून संपली."

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आरोप

यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत मोदींविरोधात तातडीने कारवाई करत प्रचारसभांमधील त्यांच्या भाषणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांचं वक्तव्य आचारसंहितेच्या उल्लंघनासह 'शहीदाचा अपमान'ही असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं.

वडिलांवरील टिप्पणीनंतर राहुल गांधींनी ट्वीटद्वारे मोदींना उत्तर दिलं होतं. "मोदी जी, आता लढाई संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहत आहे....माझ्याकडून खूप सारं प्रेम," असं ट्वीट राहुल गांधींनी केलं होतं.

तर "शहीदांच्या नावावर मतं मागून त्यांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी एका पवित्र आणि निष्कलंक व्यक्तीच्या हौतात्माच्या अनादर केला आहे. अमेठीची जनता याचं उत्तर देईल, ज्यांच्यासाठी राजीव गांधींनी आपले प्राण दिले," अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली.

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'त्या' दोन प्रकरणी क्लीनचिट

'मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे', वडिलांवरील टीकेला राहुल गांधींचं उत्तर