Basmati Rice Export: अन्नधान्याच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. गव्हासह तांदळाचे (Rice) देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते. दरम्यान, बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत भारत आघाडीवर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतानं मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली आहे. वर्षभरात निर्यातीतून भारतानं 48389.2 कोटी रुपये कमावले आहेत. पाकिस्तानच्या अडथळ्यानंतरही मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जात आहे.
सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश
दरम्यान, सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे. या ठिकाणी भारतानं यावर्षी 10.98 लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ विकून 10391 कोटी रुपये कमावले आहेत. या देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 2023 ते मार्च 2024 पर्यंत, भारताने जगातील 100 हून अधिक देशांमध्ये 52,42,511 मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे. एवढा बासमती तांदूळ कधीच निर्यात झाला नव्हता. प्रथमच एवढ्या मोठ्या तांदळाची निर्यात झाली आहे.
कशा दरानं तांदळाची विक्री
मिळालेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये भारताने बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली असून, सरासरी 1113 युस डॉलर प्रति टन या दराने निर्यात केली आहे. 2022-23 मध्ये आम्ही बासमतीची सरासरी 1050 डॉलर प्रति टन दराने निर्यात केली होती. मागील वर्षाच्या मानाने यावर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची आणि चांगल्या दरानं निर्यात केली आहे. भारतानं उरुग्वे या देशाला सर्वात जास्त दरानं तांदळाची निर्यात कली आहे. 1966 युस डॉलर प्रति टन या दरान तांदळाची विक्री केलीय.
महत्वाच्या बातम्या: