मुंबई : देशात लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती आल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची तयारी विरोध पक्षांनी केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रपतींना तसे पत्र देण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे.
या पत्रात निवडणुकीच्या निकालानंतर 17 व्या लोकसभेची अधिसूचना निघाल्यानंतर आम्हाला ही 272 चे संख्याबळ सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी विनंती विरोधक राष्ट्रपतींना करणार आहेत.
या पत्रासोबत देशात आतापर्यंत त्रिशंकू परिस्थिती सरकार स्थापनेसाठी कशी प्रक्रिया झाली? यासंदर्भात यादी देखील रेफरन्ससाठी देण्यात येणार आहे.
या पत्रावर चंद्राबाबू नायडू, ममता, अखिलेश, मायावतींचे प्रतिनिधी सतीश मिश्रा, प्रफुल पटेल, डीएमके पक्षांच्या स्वाक्षऱ्या असण्याची शक्यता आहे.
त्रिशंकू अवस्था झाली तर काय होऊ शकतं?
जर लोकसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापण्याची संधी राष्ट्रपतींकडून दिली जाते.
मात्र त्याआधी विरोधकांनी एकत्र येऊन आपला नेता निश्चित केला आणि सरकार स्थापनेचा दावा केला, तर राष्ट्रपती त्याचाही विचार करु शकतात.
त्यामुळे जर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत गाठता आलं नाही तर विरोधी पक्ष आपला नेता निश्चित करुन सर्व मित्रपक्षांच्या पत्रांच्या स्वाक्षरीसह राष्ट्रपतींना बिगर भाजप किंवा बिगर एनडीए सरकार
स्थापन करण्याची संधी देण्याची विनंती करु शकतात.
त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची विरोध पक्षांची तयारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2019 07:56 PM (IST)
या पत्रात निवडणूक निकालानंतर 17 व्या लोकसभेची अधिसूचना निघाल्यानंतर आम्हाला ही 272 चे संख्याबळ सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी विनंती विरोधक राष्ट्रपतींना करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -