नाशिक : अंकशास्त्रानुसार नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, तर एनडीएला 315 ते 325 जागा मिळणार, अशी भविष्यवाणी नाशिकचे अंकशास्त्र अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी वर्तवली आहे. भाजप 284 ते 290 जागा मिळवत संपूर्ण बहुमत मिळवेल, असं भाकितही धारणेंनी वर्तवलं आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा विजयी होतील, असं तर्कट धारणे यांनी मांडलं आहे. नरेंद्र धारणे यांच्या भविष्यवाणीमुळे भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का मानला जात आहे.

नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख 17-09-1950 आहे. या सगळ्या आकड्यांची बेरीज केली असता सहा (6) होते. त्यांचं सध्याचं वय 69 वर्ष असून याचीही बेरीज सहा होते. त्यामुळे 6 हा मोदींचा भाग्यांकच त्यांना जिंकून देणार, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अंकशास्त्र हे 100 टक्के सत्य असून माझी भविष्यवाणी ही खरीच ठरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Numerology | अंकशास्त्रानुसार भाजपचं सरकार, मोदीच पंतप्रधान, ज्योतिषी नरेंद्र धारणेंचं भाकित


राज ठाकरेंबद्दल ज्योतिष सिद्धेश्वर मारटकरांना काय वाटतं?

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आकडी आमदार दिसणार असल्याचं भाकित ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मारटकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत हातमिळवणी करुन विधानसभेत ते निवडणूक लढवतील असंही त्यांनी भाकित केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांच्या पत्रिकेत गुरु पुन्हा धनु राशीत असेल. याचाच परिणाम म्हणजे राज ठाकरेंना त्याचा फायदा होणार. तसंच राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत हातमिळवणी करुन विधानसभेत ते निवडणूक लढवतील. राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेची त्यांना मतं मिळणार असं भाकित करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसात शनीचे भ्रमण रवी समोरुन होत असल्याने 2014 ते 19 या काळात त्यांना विशेष यश मिळू शकले नाही, पण पुढे रवी समोरुन गुरु जाणार असल्याने याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मनसेचे दोन आकडी आमदार दिसणार, प्रत्यक्ष किती आणि कोण होणार हे आत्ता सांगू शकणार नाही. पण पुढे निवडणुका जाहीर होताच ते ही बघू असं म्हणत 2019 हे वर्ष राज ठाकरेंसाठी अनुकूल असल्याचं मारटकर शास्त्रींनी वर्तवलं आहे.

महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या नेत्यांचं भविष्य काय? ज्योतिष परिषदेच्या अध्यक्षांचे अंदाज

"नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, परंतु त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही", असे भाकित महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केले आहे. काल रविवारी नाशिकमध्ये ज्योतिषांची परिषद सुरु आहे. या परिषदेमध्ये ज्योतिषांकडून विविध भाकितं व्यक्त करण्यात आली आहेत.

मारटकर यांनी सांगितले की, "बहुमत मिळणार नसलं तरी मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून येतील. महाराष्ट्राबात मारटकर म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होणार आहेत."
मारटकर म्हणाले की, "मोदींची रास वृश्चिक आहे. सध्या गुरुचं भ्रमण त्यांच्या राशीतून सुरु आहे आणि हेच त्यांना सत्ता मिळवण्यासाठी पूरक ठरणार आहे."

शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रिका खूप चांगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल.

राहुल गांधी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान होण्यासाठी सध्याची परिस्थिती चांगली नाही. त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार आहे. येणाऱ्या काळात त्यांचे भविष्य चांगलं आहे.

व्हिडीओ पाहा



प्रियांका गांधी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना भविष्यात मोठी संधी मिळू शकते.

सुजय विखे-पाटील : अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांचा एकतर्फी विजय जवळपास निश्चित आहे

पार्थ पवार : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा या निवडणुकीत खूप कमी मतांनी पराभव होणार आहे. त्यांची पत्रिका चांगली आहे. श्रीरंग बारणे यांना पवार जोरदार टक्कर देतील.

समीर भुजबळ : नाशिकमध्ये समीर भुजबळ यांची ताकद वाढली आहे, नाशिकमध्ये कोण जिंकणार हे सांगणं कठीण आहे. जो कोणी उमेदवार नाशिकमध्ये निवडून येईल, तो फार कमी मतांच्या फरकाने विजयी होईल.