विचित्र अपघातात कार पेटली, गर्भवतीचा जागीच होरपळून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2019 02:15 PM (IST)
बीडमध्ये दोन कार आणि बाईकच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत गर्भवती महिलेचा होरपळून मृत्यू झाला
बीड : बीडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात गर्भवतीचा होरपळून मृत्यू झाला. कल्याण-विशाखापट्टणम रस्त्यावर झालेल्या दोन कार आणि बाईकच्या तिहेरी अपघातात महिलेला प्राण गमवावे लागले, तर तिघे जण बचावले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 म्हणजेच कल्याण विशाखापट्टणम मार्गावर बीडमधील कोळगावजवळ हा अपघात झाला. एक कार आणि स्कॉर्पिओचा अपघात झाला असताना बाईकही अपघातग्रस्त गाड्यांना येऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघातग्रस्त कारने अचानक पेट घेतला. Express Way | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू कारमध्ये बसलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तिघं जण गाडीतून बाहेर पडले, मात्र एक महिला गरोदर असल्यामुळे तिला बाहेर पडता आलं नाही. गाडी पूर्णपणे पेटल्याने या महिलेचा करुण अंत झाला. अपघातात अन्य महिलाही गंभीररित्या भाजली असून तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.