काय म्हणाले होते अजित पवार?
काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा अजित पवार तोंडी परीक्षा कार्यक्रमात दिला होता. ते म्हणाले होते की, "त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करु नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करु नये, असे अजित पवार म्हणाले. आम्ही यावर आक्षेप घेतला असता 'आम्ही त्या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार आहोत', असं म्हटलं गेलं.
यावेळी अजित पवार यांचा रोख तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता.
बाळासाहेब ठाकरेंना अटक केली ते चुकलंच, अजित पवारांची कबुली
बाळासाहेबांच्या फाईलवर सही करताना भुजबळांनी विचार करायचा होता : मुनगंटीवार
फोकस बदलायचं कारण नाही : भुजबळ
याविषयी विचारला असता छगन भुजबळ यांनी अजित पवारांना फोकस न बदलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "फोकस कशाला चेंज करता? ईडी नको त्या लोकांना अटक करतेय त्याच्यावर फोकस असताना, असा फोकस वळवण्याचा प्रयत्न करु नका. बाळासाहेबांना अटक झाली, ती केस मीच काढली. बाळासाहेबांच्या कुटुंबासह भुजबळ कुटुंबीयांनी जेवणही केलं. तो प्रश्न कधीच सुटलेला आहे, आज प्रश्न ईडी याच्या-त्याच्या डोक्यावर बसलीय, तो प्रश्न आहे, फोकस बदलायचं कारण नाही."
बाळासाहेबांना अटक का?
बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. या दंगलीच्या तपासासाठी जस्टीस श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केली, असं भुजबळ म्हणाले. एका अग्रलेखाच्या प्रकरणावरुन 2000 साली बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती.
'माझा कट्टा'वर भुजबळ काय म्हणाले होते?
''गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्या फाईल पुढे गेलेल्या होत्या. मात्र नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. पोलिसांनी सांगितलं यावर कारवाई करायला पाहिजे. त्यानंतर त्या फाईलवर फक्त सही केली, ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार झाली नव्हती,'' असं भुजबळ म्हणाले.