Madha Loksabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात ( Madha Loksabha Election) भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना  (Ranjeetsingh Nimbalkar) उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात भाजपच्या मित्रपक्षाकडून विरोधा होत आहे. उमेदवार बदलाची सातत्यानं मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा पाढाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसोमर वाचला. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार यावेळी अजित पवारांकडे करण्यात आली. 


रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल सातत्यानं तक्रारी


माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha Election) उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासमोर पाढा वाचला. रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे राष्ट्रवादीच्याच नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करणं आम्हाला शक्य नाही अशी थेट भूमिका अजित पवार यांच्यासमोर मांडली. माढा लोकसभा मतदारसंघात सातत्याने रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल तक्रार येत आहे. त्यांची वागणूक योग्य नसल्यामुळं आम्हाला काम करायला अडचणी येत असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.  


युतीधर्म पाळा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश


दरम्यान, देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आज बैठक पार पडली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी माढा लोकसभा (Madha Loksabha)मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तत्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यासोबतच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.अजित पवार यांनी महायुतीचं काम करावे लागेल अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. तर रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारींबाबत लवकरच अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


माढ्यात विरोध कराल तर बारामतीत...खास विमानानं निंबाळकर नागपुरात दाखल, फडणवीसांसोबत तातडीची बैठक