नांदेड : राज्यभरात राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाहीये. अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर आता नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी सोडल्याचे जाहीर केले आहे.
श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी सोडल्याचे जाहीर केले. ही घोषणा करताना त्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आणि चर्चा केली. गोरठेकर हे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आहेत. स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांना कंटाळून आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
जिल्ह्यातील किनवट विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक आणि लोहाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर धोंडगे हे दोघेही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्यात सहभागी आहेत. पण त्यांची नावे गायब झाल्याचा आरोप यावेळी गोरठेकरांनी केला आहे.
गोरठेकर हे राष्ट्रवादीकडून 2004 ते 2009 या काळात नायगाव मतदार संघातून आमदार होते. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने आता गोरठेकर कोणत्या पक्षात जाणार हे अजून त्यांनी स्पष्ट नाही. ते अशोक चव्हाण यांच्या विरोधात भोकर मतदार संघातून भाजपच्या रसदीवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गोरठेकर यांना भोकर मतदार संघात मानणारा मोठा वर्ग असल्याने अशोक चव्हाण यांच्या मार्गात अडचण निर्माण होणार आहेत.
नांदेड जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीला रामराम, आजी-माजी आमदार घोटाळेबाज असल्याचा आरोप करत सोडला पक्ष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2019 05:34 PM (IST)
श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी सोडल्याचे जाहीर केले. ही घोषणा करताना त्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आणि चर्चा केली. गोरठेकर हे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -