- महाजनादेश यात्रेच्या समारोपात पंतप्रधान, मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी
- मी बरं वाईट केलं असेल, पण कधी तुरुंगात गेलो नाही, शरद पवारांचा अमित शाहांना टोला
- अन्यायाची समज यायला उदयनराजेंना 15 वर्षे लागली : शरद पवार
मला आणखी काही नको, महाराष्ट्रासाठी काम करणं हीच इच्छा; शरद पवारांचं भावनिक ट्वीट
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2019 10:46 AM (IST)
गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती शरद पवारांनाही रोखता आली नाही. त्यांच्या जवळच्या, नात्यातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील महिन्यात अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये एका प्रश्नावर शरद पवार अगतिक झालेले पाहायला मिळाले.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक ट्वीट केलं आहे. "महाराष्ट्राने मला भरभरुन दिलं. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे," असं पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शरद पवार ट्वीटमध्ये लिहितात, "महाराष्ट्राने मला भरभरुन दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, १० वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरुन दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे." दुष्काळ, निवडणुका काहीही असो, 78 वर्षांचे शरद पवार कायम राज्यभर दौरा करताना दिसतात. याविषयी त्यांना या वयात दौरा करण्यावरुन विचारणा होते. यावर शरद पवार ट्वीटमध्ये म्हणतात की? "या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे." गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती शरद पवारांनाही रोखता आली नाही. त्यांच्या जवळच्या, नात्यातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील महिन्यात अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये एका प्रश्नावर शरद पवार अगतिक झालेले पाहायला मिळाले. संबंधित बातम्या