1. मंदीचं मळभ दूर करण्यासाठी सरकारी प्रयत्न, हॉटेलसह अनेक गोष्टींवरील जीएसटीत कपात, मात्र कॅफिनेटेड ड्रिंकवरचा जीएसटी 18 वरुन 28 टक्क्यांवर

2. येत्या दोन दिवसात युतीचा निर्णय, उद्धव ठाकरेंची माहिती, शिवसेनेकडून लोकसभेला झालेल्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची आठवण

3. विधानसभा लढवण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आग्रह, निर्णय मात्र राज ठाकरे घेणार, मनसे 100 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती

4. 'एबीपी माझा'च्या कॅम्पेननंतर सरकार कामाला, ठाणे-नवी मुंबईतील खड्डेभरणी सुरु, तर अभिनेता वैभव मांगलेकडून खड्ड्यांवर विडंबन

5. हार्डकोर पॉर्न, सामूहिक बलात्काराची इच्छा, मुंबईच्या कॉलेज तरुणाईची विकृती सर्वेक्षणात समोर, 'एबीपी माझा'चा स्पेशल रिपोर्ट

6. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना, ह्यूस्टनमध्ये मुसळधार पावसामुळे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमावर पावसाचं सावट

7. राज्यसभेचं अडीचशेवं सत्र ग्रॅण्ड बनवण्यासाठी सरकारकडून जय्यत तयारी, नोव्हेंबर महिन्यात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मेगा इव्हेंट, आजी-माजी सदस्यांनाही आमंत्रण

8. नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या गोल्ड बँकेवर सशस्त्र दरोडा, कर्मचाऱ्यांना बंधक करुन 1 कोटी 75 लाख किंमतीचं सोनं लुटलं

9. वेळ आली आहे, कोणीही दबाव टाकण्याआधी महेंद्रसिंह धोनीने निवृत्त व्हावं, माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांचा सल्ला

10. पैलवान बजरंग पुनिया, रवी कुमारला जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदक, तर अमित पंघाल जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत