Amol Mitkari अकोला : महाराष्ट्र आणि बारामतीत (Baramati Lok Sabha Election)अजितदादांना (Ajit Pawar) भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मत भेटली नसल्यानेच अजित पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलाय. ते अकोला येथे एबीपी माझा शी बोलत असताना त्यांनी हे मोठे विधान केले आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांना मिळालेली मतं ही फक्त अजित दादांचीच असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय.
दरम्यान, पक्ष आणि पक्ष चिन्ह हातातून गेल्यानंतरही चांगली कामगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर त्यांनी स्तुतिसुमनं देखील उधळलीय. लोकसभेवर निवडून गेलेल्या निलेश लंकेचेही त्यांनी अभिनंदन केलंय. मात्र, विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आपले पाय जमिनीवरच ठेवावेत, असा टोलाही यावेळी मिटकरी यांनी लगावलाय.
अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या असत्या तर आज चित्र वेगळं असतं
लोकशाहीमध्ये जनता ची सर्वस्वी असते. जनतेने जो कौल दिला तो आम्हाला प्रामाणिकपणे मान्य आहे. कदाचित त्यांना आमचे काही निर्णय पटले नसावे, असेच एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे. आम्हाला नाशिक,गडचिरोली, धाराशिव, इत्यादी अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या असत्या तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. मात्र एकंदरीत राज्याचे समीकरण बघितले तर महायुतीच्या इतर घटक पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नक्कीच फायदा झाला आहे. मात्र त्या दोन्ही पक्षांचा राष्ट्रवादी पक्षाला फायदा झाला असता तर आज बारामतीचे चित्र वेगळं असतं आणि आमचा पराभव झाला नसता, असा मोठा दावा अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
बारामतीतील पराभव हा नक्कीच धक्कादायक
हाती आलेले निकाल हे नक्कीच अनपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नक्कीच आम्हाला कमी वेळ मिळाला. मिळालेल्या वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र जनतेने जो काही कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. बारामतीतील पराभव हा नक्कीच धक्कादायक आहे. कारण विकासाचे राजकारण करण्यासाठी अजित पवार यांनी भर दिला होता त्यांनी कुठेही भावनिक मुद्द्यांना हात घातला नाही. मात्र बारामतीकरांनी भावनिक मुद्द्यांनाच अधिक महत्त्व दिल्याचे या निकालातून पुढे आल्याचे दिसत आहे. यातून आम्ही बरेच काही गोष्टी शिकणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी परत पुढे जाऊ कारण या राज्यात अजितदादांचे नेतृत्व महत्वाचे आहे. सर बारामतीच्या पराभवाची सर आम्ही भरून काढू, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Baramati Result : ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका