UP Lok Sabha Election Results 2024: उत्तर प्रदेशातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. फैजाबाद मतदारसंघात अयोध्या येते, येथेच भाजपला पराभवाचा सामना करावा लागतोय. 500 वर्षानंतर प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाली होती. प्रचारात हा मुद्दा गाजला होता. पण अयोध्यामध्येच भाजपला पराभाचा सामना करावा लागत असल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 


रामाच्या भूमीत भाजपला पराभवाचा झटका बसण्याची शक्यता आहे. फैजाबाद लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाचा विजय जवळपास निश्चित झालाय. भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागतोय समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय झालाय. 


समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांना 550209 इतकी मते मिळाली आहेत. तर भाजपचे अनुभवी लल्लू सिंह यांना 494505  इतकी मते मिळाली आहे. समाजवादी पार्टीच्या  अवधेश प्रसाद यांचा 55704 मतांनी विजय झाला.


फैजाबाद लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी मतदान झाले होते. फैजाबाद लोकसभा जागेवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर येथे एकूण 50.9 टक्के मते पडली, येथे भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी 65 हजारांहून अधिक मतांनी सपाचे आनंद सेन यादव यांचा पराभव केला होता. तर काँग्रेसचे उमेदवार निर्मल खत्री तिसऱ्या स्थानावर होते. लल्लू यादव यांना 5 लाख 29 हजार 21 तर आनंद सेन यादव यांना 4 लाख 63 हजार 544 मते मिळाली होती.


नरेंद्र मोदींचा विजय -


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमधून 152513 विजय झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी 612970  मते मिळवत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे अजय राय यांना 460457 मतांवर समाधान मानावे लागेल. मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा एका क्षणी पंतप्रधान मोदी यांना अजय राय यांनी पिछाडीवर टाकले. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत अजय राय यांनी पंतप्रधान मोदींवर 6000 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली.


उत्तर प्रदेशमध्ये सध्या काय स्थिती आहे ? 


समाजवादी पार्टी (Samajwadi Party - SP) - 36 जागांवर आघाडीवर


भाजप (Bharatiya Janata Party - BJP) - 33 जागांवर आघाडीवर


काँग्रेस (Indian National Congress - INC) - 7 जागांवर आघाडीवर 


राष्ट्रीय लोक दल (Rashtriya Lok Dal - RLD) - 2 जागांवर आघाडीवर


आझाद समाज पार्टी (कांशी राम) Aazad Samaj Party (Kanshi Ram) - ASPKR - एका जागेवर आघाडीवर


Apna Dal (Soneylal) - ADAL - एका जागेवर आघाडीवर