मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा पराभव झाला आहे. तर त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा (Ravi Rana) हे विजयी झाले असून राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माझ्या पराभवाचं श्रेय राणा दापत्यानं घेऊ नये, असे म्हणत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला. आता नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांनी बच्चू कडूंना डिवचले आहे.  


नवनीत राणा म्हणाल्या की, हे माझे श्रेय नाही आहे. माझ्या जनतेने बदला घेतलाय. दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंना टोला लगावला. मी लहान आहे. पण, आता कसं वाटतं, तुमची औकात काढली. स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावले नाही, दुसरीकडे काय लावणार? अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतल्याबाबत विचारले असता मी शुभेच्छा द्यायला आली होती. अपेक्षित निकालापेक्षा जास्त निकाल आला आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार, असे मला वाटते. आम्ही देवेंद्रजींचे सैनिक आहोत, असे त्यांनी म्हटले. 


आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही : रवी राणा


तर रवी राणा म्हणाले की, आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. लोकांनी त्यांना हटवलं आहे. बच्चू हटाव हा नारा लोकांनी दिला.  ते म्हणाले होते, मी मुख्यमंत्री होईन पण त्यांनी आता बोलणे बंद करायला हवे. पाच वर्षानंतर मी बच्चू कडू यांचे आवाहन स्वीकारेन. ते सांगतील तिथे मी उभा राहीन.  बच्चू कडू कुणाच्या तरी पक्षात प्रवेश करतील. लोकसभेला त्यांनी मतांचे विभाजन केले, त्यामुळे जनतेने त्यांचा बदला घेतला, असा हल्लाबोल त्यांनी बच्चू कडूंवर केला. तसेच मागील 15 वर्षांपासून मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. तेच मुख्यमंत्री राहतील, असा मला विश्वास आहे. मी मंत्रिपद मागितलेले नाही, असेही रवी राणा यांनी सांगितले. 


नवनीत राणांचा संजय राऊतांवर निशाणा


दरम्यान, नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मैंने सुना है समय देख के बहुत लोग बदलते है, पर यह लोग भी बदल गये. रामजी भाजपचे एकट्याचे नाही, ते असे म्हणत आहे तसे बाळासाहेब ठाकरे देखील एका कुटुंबाचे नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, असे टीका त्यांनी यावेळी केली. आम्ही महायुती सरकारमध्ये आहोत. आम्ही सर्व मिळून लढणार आहोत, असेही नवनीत राणा यांनी सांगितले. 


आणखी वाचा 


Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?