सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली आहे. आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथं येईन, असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना दिलं आहे. यावेळी उदयनराजेंना आव्हान देताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.
महायुतीची काल साताऱ्याच्या कोरेगावात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात भाजपतून शिवसेनेत आलेले नरेंद्र पाटील रिंगणात आहेत.
सभेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना अर्वाच्च भाषेचा वापर करत खुलं आवाहन दिलं. उदयनराजेंनी केलेल्या विकास कामाबाबत सांगताना त्यांनी दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव का देता, असं म्हणत स्वत:च्या पोराकड लक्ष देण्याचा सल्ला देखील दिला.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही. तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडं येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला.
चौदा वर्षात टोलमुक्त सातारा होऊ शकला नाही. खासदार झाल्यानंतर सातारा जिल्हा टोलमुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात डिफरंट कॅरेक्टर आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की खामोश म्हटलं जातं. खासदारांना विकासावर बोलता येत नाही. टीव्ही चॅनेलवर 17 हजार कोटींचा विकास होता. पत्रकार परिषदेत 18 हजार कोटी झाला. आठ दिवसात हजार कोटी कसे वाढले हेच समजले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
विकास काम मोदींनी आणि आमच्या मंत्र्यांनी केली. तुम्ही दुसऱ्याच्या पोराला आपल नाव का देताय, कृपाकरून आपण आपल्या पोराकडं पाहावं, असेही पाटील म्हणाले.
हिंमत असेल तर सांगा, तुम्ही म्हणाल तिथं येईन, उदयनराजेंना आव्हान देताना नरेंद्र पाटलांची जीभ घसरली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Apr 2019 08:10 AM (IST)
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही. तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडं येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -