ओदिशानंतर फनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत विचारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांच्या कार्यालयाकडून 'मुख्यमंत्री दौऱ्यावर असून त्या परतल्यावर फोन करण्यात येईल', असं सांगण्यात आलं.
शुक्रवारी(ता. 3 मे) सकाळी फनी चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकले होते. त्यानंतर या वादळाचा प्रवास पश्चिम बंगालच्या दिशेने सुरु झालेला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी आपला निवडणूक दौरा रद्द केल्याचेही वृत्त आले होते. ममता बॅनर्जी यांनी मोदींशी बोलण्याचं टाळलं असा अंदाज सध्या लावला जात आहे.